हार पचवता येत नसल्याने माजी आमदारांची विकृती – लोणारी

0

भुसावळ |  प्रतिनिधी :  माजी आ. संतोष चौधरी यांच्यासह नगरसेवक उल्हास पागारे व सहकार्‍यांनी येथील शासकीय विश्रमगृहात येऊन परिसरात आ. सावकारे यांच्या फंडातून लावलेल्या एका बाकड्यावरील नाव का काढले नाही म्हणून सा.बां.अभियंता कुरेशी यांच्या मुलाशी वाद घालून परिवारासह आ.सावकारे यांंना गलिच्छ शब्दात शिविगाळ करुन सदर बाकड्यावर लघुशंका केल्याच्या घटनेचा भाजपातर्फे निषेध करण्यत येत असून बाकड्यावरील खोडण्यात आलेले नाव पून्हा टाकण्यात येणार असल्याचे उपनगराध्यक्ष युवराज लोणारी यांनी पत्रपरिषदेत सांगितले.

येथील शासकिय विश्रामगृहावर भाजपा नगरसेवकांतर्फे पत्र परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस प्रा.डॉ.सुनील नेवे, गिरीष महाजन, रिपाइंचे रमेश मकासरे, भाजपा शहराध्यक्ष पुरुषोत्तम नेमाडे, गटनेता हाजी मुन्ना तेली, पाणी पुरवठा सभापती किरण कोलते, शे.शफी, माजी नगरसेवक वसंत पाटील, नगरसेवक रमेश नागराणी, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे, नगरसेवक राजेंद्र नाटकर, पिंटू कोठारी, पिंटू ठाकूर, रमाकांत महाजन, किशोर  पाटील, गणेश धनगर उपस्थित होते.

शांत झालेल्या शहरात पुन्हा गुंडागर्दी सुरु झाली आहे. माजी आ. चौधरी यांच्याकडून नगरसेवक, कार्यकर्ते व अधिकार्‍यांना निवडणूकीच्या काळातही अशा प्रकरे धमकावण्यात येत होते. शहरात वाढणारी ही गुंडागर्दी लवकर थांबविणे गरेजेचे आहे. पालिकेच्या सत्ताधार्‍यांचे लक्ष विकेंद्रीत करण्याचा हा प्रयत्न आहे.

पालिकेत झालेली हार पचवता येत नसल्याने माजी आमदारांकडून अशा क्लृप्त्या लढविल्या जात आहे. आ. सावकारे यांच्या फंडातून शहरात लावण्यात आलेल्या  हायमस्ट लॅम्पच्या बॅटर्‍यांची चोरी ही माजी आमदार समर्थकांकडून करण्यात येत असल्याचाही आरोप लोणारी यांनी यावेळी केला.आम्ही पालिकेत सत्ता स्थापन करतांना चुकीचे काहीच केले नसल्याने अपात्रतेची भिती आम्हाला नसल्याचेही ते म्हणाले.

माजी आमदारांची शहरातील भिती कमी होत असल्याच्या भीतीमुळे त्यांचे उपद्व्याप करून ते शहरात भिती निर्माण करीत अहे. हे  प्रकार थांबवून शहराचा विकास व्हावा या दृष्टीने आम्ही प्रयत्न करीत असल्याचे सांगितले.

तसेच शहरातील शिवाजी रोडच्या विकास कामाचे उद्घाटन दि. ३ रोजी सकाळी १० वाजता आ.संजय सावकारे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असल्याचे सांगितले.

भाजपाचे जिल्हा सरचिटणीस प्रा.डॉ.सुनील नेवे यांनी, असे कृत्य करणारे गुंडप्रवृत्तींना जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. यासाठी आगामी काळात मुख्यमंत्री याची भेट घेण्यात येणार असल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

*