हाफिज सईदचा राजकारणात प्रवेश; नव्या पक्षाची घोषणा

0

दहशतवादी हाफिज सईदची संघटना ‘जमात-उद-दावा’ने राजकारणात प्रवेश करत असल्याची घोषणा केली आहे.

हाफिज सईदच्या या राजकीय पक्षाला ‘मिल्ली मुस्लिम लीग’ असं नाव देण्यात आलं आहे.

‘जमात-उद-दावा’चा वरिष्ठ सदस्य सैफुल्लाह खालिद याची पक्षाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

सोमवारी इस्लामाबादमध्ये पार पडलेल्या पत्रकार परिषदेत पक्षाचं नाव, लोगो आणि झेंडा जाहीर करण्यात आलं.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सैफुल्लाह याने सांगितलं की, ‘पाकिस्तानला एक इस्लामिक देश बनवण्याचा मिल्ली मुस्लिम लीग प्रयत्न केलं. तसंच त्याच्या कल्याणासाठी काम करेल’.

 

LEAVE A REPLY

*