हातनूर येथे पैशांच्या वादातून महिलेला मारहाण

0

धुळे । दि.31 । प्रतिनिधी-उसनवार पैसे दिल्याच्या वादातून एका महिलेला मारहाण केल्याची घटना तालुक्यातील हातनूर येथे घडली. शिंदखेडा पोलिसात संशयीत दोघांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

चंद्रकलाबाई दौलत बागूल (वय40) रा. हातनूर या महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार चुलत भावामार्फत दिलेले पैसे परत मागितले. याचा आल्याने योगेश गुलाबराव पाटील, गुलाब पितांबर पाटील रा. हातनूर यांनी या महिलेस मारहाण करुन जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या फिर्यादीनुसार वरील संशयीत दोघांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोहेकॉ वळवी करीत आहेत.

दुचाकीस्वार जागीच ठार – सुरत बायपास रस्त्यावर भरधाव ट्रकने उडविल्याने दुचाकीस्वारील तरुण जागीच ठार झाल्याची घटना रात्री घडली आहे.लक्ष्मीनगर देवपूर, धुळे येथे राहणार्‍या नितीन बाविस्कर (वय27) या तरुणाने शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार दि. 29 रोजी रात्री 11.30 वाजता रमेश मनोहर पाटील (वय33) रा. बहादरपूर, ता. पारोळा हा तरुण एमएच 18 एटी 2390 क्रमांकाच्या मोटारसायकलने जात असतांना सुरत वळण रस्त्यावर हिरे मेडिकल कॉलेजजवळ भरधाव ट्रकने दुचाकीला उडविले. या अपघातात रमेश पाटील जागीच ठार झाला. अज्ञात ट्रक चालकाविरुध्द शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

वाहनाची काच फोडली – शहरातील फाशीपुलावर प्रवासी वाहतूक करणार्‍या खासगी वाहनाची काच अज्ञात व्यक्तीने फोडली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील शिवशक्ती कॉलनीत राहणारे जगदीश सतीश तांदळस्कर (वय 30) रा. प्लॉट नं. हे खासगी प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय करतात. ते महिंद्रा मॅक्स वाहन (क्र.एमएच 18-ए.जे.4220) घेऊन फाशीपूल येथे गेले होते. त्या वेळी या चौकात त्यांच्या वाहनाच्या पुढील काचेवर अज्ञात व्यक्तीने दगड फेकला. हा प्रकार शनिवारी (दि.28) दुपारी तीन वाजता घडला. याबाबत जगदीश तांदळस्कर यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

LEAVE A REPLY

*