हाऊस ऑफ इन्व्हेस्टमेंंटशी व्यवहार पडणार महागात ; इतर कंपन्यांच्या संचालकांवर दाखल होणार गुन्हे

0

नाशिक : हाऊस ऑफ इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी सर्व संचालकांना जेरबंद केले आहे. या कंपनीस आर्थिक व्यवहार करण्यास बंदी होती. मात्र कंपनीच्या संचालकांनी हा नियम जुगारुन गुंतवणुकदारांकडून कोट्यवधी रुपये गोळा केले. त्यानंतर हा पैसा इतर कंपन्यांमध्येही गुंतवल्याचे समोर येत आहे. त्यामुळे या कंपन्यांसह त्यांच्या संचालकांविरोधातही गुन्हे दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यादृष्टीने आर्थिक गुन्हे शाखेचा तपास सुरू आहे.

ऑगस्ट 2016 मध्ये गंगापूर रोडवरील हाऊस ऑफ इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या संचालकांविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तपास करून सर्व संचालकांना अटक केली. नुकतेच मुंबई येथ्ाून कंपनीचा मुख्य संचालक विनोद बाळू पाटील यास देखील अटक केली. त्याच्याकडे केलेल्या चौकशीतून अनेक व्यवहार समोर येत आहेत. त्याचप्रमाणे अर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या सखोल तपासात हाऊस ऑफ इन्व्हेस्टमेंट या कंपनीस नागरिकांकडून कोणत्याही प्रकारची गुंतवणूक स्वीकारता येणार नसल्याचे समोर आले.

तरीदेखील कंपनीच्या संचालकांनी या नियमाचे उल्लंघन करत नागरिना जादा परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांच्या ठेवी जमा केल्या. त्यानंतर गुंतवणूकदारांचे पैसे न करता हा पैसा इतर कंपन्यांमध्ये गुंतवला तसेच मालमत्ताही खरेदी केल्याचे समोर येत आहे.

त्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेने संशयितांची मालमत्ता जप्त करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. त्याचप्रमाणे हाऊस ऑफ इन्व्हेस्टमेंट कंपनीसोबत ज्या कंपन्यांनी व्यवहार केले आहेत, त्या कंपन्यावर कारवाई करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेने कंपनी निंबधकांशी पत्रव्यवहारही केला आहे. त्यामुळे भविष्यात या कंपन्यांशी संलग्नित कंपन्यांसह त्यांच्या संचालकांवरही कारवाईची टांगती तलवार आहे.

सुरुवातीस तक्रार करण्यासाठी छोट्या गुंतवणुकदारांनी पोलिसांशी संपर्क साधला होता. त्यानंतर फसवणुकीचा आकडा वाढत गेला. कंपनीचा मुख्य संचालक विनोद पाटील हा गुंतवणुकदारांशी संपर्क ठेवून पैसे परत करण्याचे आश्वासन देत होता. या आश्वासनाला भुलून मोठ्या गुंतवणूकदारांनी तक्रार केल्या नव्हत्या.

LEAVE A REPLY

*