हस्ती स्कूल येथे शिक्षकांसाठी कार्यशाळा

0
दोंडाईचा । दि.12 । वि.प्र.-हस्ती पब्लिक स्कूल अ‍ॅन्ड ज्युनिअर कॉलेज येथे दोन दिवशीय शैक्षणिक कार्यशाळेचे आयोजन शालेय समिती चेअरमन कैलास जैन यांच्या मार्गदर्शनाने हस्ती बहुद्देशिय सांस्कृतिक भवन येथे आयोजीत करण्यात आले होते.
या कार्यशाळेस महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणेचे माजी सचिव प्रा.शहाजी ढेकणे, प्रज्ञाशोध पुणेचे संचालक प्रा.जी.सी.कुलकर्णी, प्रा.जी.आर.माळी, एसएनडिटी कॉलेज पुणेचे माजी उपप्राचार्य प्रा.लक्ष्मणराव मालुसरे, महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम समिती सदस्य डॉ.दिलीप जी. देशमुख मार्गदर्शक होते.

या दोन दिवशीय शैक्षणिक कार्यशाळेत तज्ज्ञ मार्गदर्शकांनी विविध शैक्षणिक विषयांवर मार्गदर्शन केले. यात शैक्षणिक धोरणांचे उपयोजन, शाळा व शिक्षक गुणवत्तावाढ व विषयांची समृद्धी, स्पर्धा परीक्षा महत्व, नियोजन, मानसिक क्षमता कसोटीसोबतच भाषा, गणित, विज्ञान व सामाजिक शास्त्र या शालेय अभ्यासक्रमातील विषयांचे प्रभावी अध्यापन कसे करावे? शैक्षणिक साधनांचा वापर, प्रश्नपत्रिका व कृतिपत्रिका तंत्र व मंत्र, विद्यार्थ्यांचे मुल्यमापन, विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील गुणवत्ता वाढ कशी करावी? त्यांचा शारीरिक, मानसिक व बौद्धीक विकास कसा साधावा? या विषयीचे मंत्र व तंत्र तसेच मुल्यशिक्षण या विषयांचा समावेश होता. या कार्यशाळेचा हस्ती स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे शिक्षक, शिक्षिकांनी लाभ घेतला.

LEAVE A REPLY

*