Type to search

क्रीडा धुळे

हस्ती स्कूलच्या फुटबॉल संघाची जिल्हास्तरावर निवड

Share

दोंडाईचा | हस्ती चॅरिटेबल ट्रस्ट संचलीत, हस्ती पब्लिक स्कूल अँड ज्यु. कॉलेज, दोंडाईचा येथील मुलांच्या फुटबॉल संघाने हस्ती बहुउद्देशिय सांस्कृतिक भवन येथे झालेल्या तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत चमकदान कामगिरी केली. त्यांची आगामी जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय यांचेतर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत हस्ती स्कूलच्या १४ वर्ष आतील व १७ वर्ष आतील मुलांच्या फुटबॉल संघांनी कौशल्यपूर्ण व चमकदार फुटबॉल खेळाचे प्रदर्शन केले. त्यांची आगामी जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. त्यात मुले- १४ वर्ष आतील फुटबॉल संघात अक्षय पाटील, संदेश धनराडे, विकास पावरा, राजपाल गिरासे, भुपेंद्र परदेशी, प्रतीक जाधव, परिक्षीत पटेल, जयेश पाटील, जयेश बी. पाटील, गोविंदा गांगुर्डे, गणेश पाटील, केतन बागल, कृपाल चौधरी, किरण पावरा, करण अग्रवाल, अमित ठाकरे, अथर्व गोस्वामी, हिमांशू चौधरी यांचा समावेश आहे. तर १७ वर्ष आतील संघात अमित बहिरम, समर्थ म्हसे, सचिन देशमुख, शुभम सैंदाणे, विवेक पाटील, विवेक गिरासे, वासुदेव अग्रवाल, रोहन बोरसे, रोशन बहिरम, मुदित जैन, मानव साळुंखे, मनीष पाटील, ताहा बोहरी, कुणाल पवार, कल्पेश पदमोर, करण पावरा, कणु पवार, स्पंदन भामरे या फुटबॉलपटूंचा समावेश आहे.

वरील सर्व यशस्वी फुटबॉलपटूंना हस्ती स्कूल क्रीडा विभाग प्रमुख प्रकाश खंडेराय, क्रीडा शिक्षक दुर्गेश पवार, विशाल पवार, लखन थोरात यांचे मार्गदर्शन लाभले. तर शालेय समिती चेअरमन कैलास जैन, सदस्य डॉ. विजय नामजोशी, प्राचार्य हरिकृष्ण निगम यांनी कौतुक केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!