Type to search

क्रीडा धुळे

हस्ती स्कूलच्या ज्युडोपटूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड

Share

दोंडाईचा | येथील हस्ती चॅरिटेबल ट्रस्ट संचलित, हस्ती पब्लिक स्कूल ऍण्ड ज्यु. कॉलेज, दोंडाईचा येथील ज्युडोपटू जिल्हास्तरीय शालेय ज्युडो स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

या स्पर्धेत हस्तीच्या ज्युडोपटूंनी दमदार कामगिरी बजावली. त्यामुळे त्यांची आगामी विभागस्तर शालेय ज्युडो स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. त्यात मुले- १४ वर्ष आतील वजन गट २५ ते ३० किलो- राजेश विकास गांगुर्डे, १७ वर्ष आतील वजन गट ३५ ते ४० किलो नवनाथ भावराव बागुल; वजन गट ४० ते ४५ किलो- विजय साईनाथ चौधरी, वजन गट ५० ते ५५ किलो सचिन दिलीप पावरा यांचा समावेश आहे.

या ज्युडोपटूंना हस्ती स्कूल क्रीडा विभाग प्रमुख प्रकाश खंडेराय, दुर्गेश पवार, निलेश धनगर यांचे मार्गदर्शन लाभले. तर शालेय समिती चेअरमन कैलास जैन, सदस्य डॉ. विजय नामजोशी तसेच प्राचार्य हरिकृष्ण निगम यांनी कौतुक केले आहे. हस्ती स्कूल दरवर्षी नियमितपणे अशा स्वरूपाच्या विविध क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी होण्यास प्रेरित करते. याद्वारा त्यांच्यातील सुप्त क्रीडा गुणांना वाव मिळतो; सोबतच त्यांचा व्यक्तिमत्वाच्या सर्वांगीण विकासासही चालना मिळते असे संस्थेतर्फे सांगण्यात आले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!