हस्ती स्कूलचे राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत यश

0

दोंडाईचा ।  वि.प्र.- हस्ती चँरिटेबल ट्रस्ट संचलित हस्ती पब्लिक स्कूल अ‍ॅण्ड ज्यु.कॉलेज दोंडाईचा येथील फेन्सिंगपटूंनी चमकदार कामगिरी बजावत, दैदीप्यमान यश मिळविले.

यात मुलींच्या सांघीक गटात- फॉईल प्रकारात-कानन जैन, सिमरन अग्रवाल, आयुषी भावसार, प्रांजल जाधव यांच्या संघाने दमदार कामगिरी बजावली. तर ईपी प्रकारात-कानन जैन, वैष्णवी कागणे, अक्षरा वाडीले, भूमिका निगम यांच्या संघाने पदकाची कमाई केली. तसेच मुले सांघीक गटात ईपी प्रकारात स्वयं बोरसे, रोहन सोनवणे,निखील पाटील यांच्या संघाने पदक पटकावले तर फॉईल प्रकारात स्वयं बोरसे, हितार्थ अग्रवाल, निहार सिसोदिया यांच्या संघाने देखील पदक मिळविले. मुलींच्या वैयक्तिक गटात कानन जैन हिने ईपी प्रकारात ब्रांझ पदक पटकावले. यामुळे तिची आगामी ओरीसा कटक येथे होणार्‍या राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.

विशेषत: सदर स्पर्धेत कानन जैन हिने सांघीक गटात तीन पदकांची कमाई केली. तसेच स्पर्धेची तृतीय क्रमांकाची चँपियनशिप मुलांच्या संघाने पटकावली. या सर्व यशस्वी फेन्सिंगपटूंना स्पर्धा स्थळी अखिल भारतीय तलवारबाजी संघटना खजिनदार अशोक दुधारे, महाराष्ट्र राज्य तलवारबाजी संघटना सचिव उदय डोंगरे व शिरपूर न.पा.नगरसेवक प्रभाकराव चव्हाण या मान्यवरांच्या हस्ते पदक प्रदान करून गौरविण्यात आले.

यशस्वी फेन्सिंगपटूंचे हस्ती स्कूल फेन्सिंग कोच विशाल पवार,क्रीडा विभाग प्रमुख प्रकाश खंडेराय यांचे मार्गदर्शन लाभले; तर शालेय समिती चेअरमन कैलास जैन, सदस्य डॉ.विजय नामजोशी तसेच प्राचार्य एस.एन.पाटील यांनी अभिनंदन केले. हस्ती स्कूल दरवर्षी नियमितपणे अशा स्वरूपाच्या क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी होतेस प्रेरित करते.

LEAVE A REPLY

*