हस्ती स्कुलला आयएसओ दर्जा

0

दोंडाईचा / दोंडाईचा शहरात गेल्या पंधरा वर्षापासून दर्जेदार व गुणवत्ता युक्त इंग्रजी माध्यमाचे शिक्षण देण्यात सदैव अग्रेसर असणार्‍या हस्ती स्कूलच्या पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व ज्यु.कॉलेजला, शिक्षण क्षेत्रातअत्यंत मानाच समजल जाणार आय.एस.ओ. 9001-2015 मानांकन प्रमाणपत्र नुकतेच प्राप्त झाले आहे.

हे प्रतिष्ठेचे मानांकन प्रमाणपत्र इंटरनॅशनल अ‍ॅक्रीडिएशन फोरम यांचेशी संलग्नीत आरओएचएस सर्टिफिकेशन प्रा.लि. यांच्या वतीने इंटरनॅशनल स्टॅन्डर्डर जिस्ट्रेशन संस्था नवी दिल्ली यांच्याकडून प्रदान करण्यात आले.

यास्तव दोंडाईचा शहरात आयएसओ मानांकन प्राप्त एक आणि एकमेव शाळा असल्याचा गौरव हस्ती स्कूलने मिळविला आहे.

सदरच्या आयएसओ 9001-2015 मानांकनासाठी इंटरनॅशन लस्टँडर्ड रजिस्ट्रेशन नवी दिल्ली यांचे वतीने हस्ती स्कूलच्या पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्चमाध्यमिक व ज्यु.कॉलेज या सर्व विभागांचे लेखापरीक्षण करण्यात आले.

सदर लेखापरीक्षणाच्या पूर्व तयारीसाठी पीथ्रीमॅनेजमेंट सर्व्हिसेस नाशिकचे लिड कन्सलटंट पी.एस.पाटील यांनी सहकार्य केले.

यात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दर्जेदार इंग्रजी माध्यमाचे शिक्षण देणे, गुणवत्तायुक्त अध्ययन अध्यापन पद्धती, आदर्श दस्तावेज, शालेय इमारत, सायन्स लॅब, कॉम्प्युटर लॅब, मॅथ्स्लॅब, लँग्वेज लॅब, सोशल स्टडी लॅब, ग्रंथालय, संगीत दालन, क्रीडा विभाग साहित्याचा जिमखाना व आर.ओ. सिस्टमचे प्युरिफाईड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अशा विद्यार्थ्यांसाठीच्या दर्जेदार मुलभूत शैक्षणिक सुविधायांचे परिक्षण करण्यात आले.

सोबतच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, पर्यावरण संवर्धन या जाणीवांचे संस्कार रुजविण्यासाठी राबविले जाणारे उपक्रम तसेच शिक्षकांचे ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी व अध्यापन कार्य प्रभावी होण्यासाठी तज्ञांचे उद्बोधनवर्ग व कार्यशाळा आणि पालकांसाठी व्याख्याने, मार्गदर्शन, समुपदेशन व उद्बोधन वर्गांचे आयोजन करणे याबीबींचे ही निरीक्षण करण्यात आले.

वरील सर्व बाबी इंटरनॅशनल स्टॅन्डर्ड रजिस्ट्रेशन नवी दिल्ली यांना परिक्षणा दरम्यान दर्जेदार व गुणवत्तायुक्त आढळल्या.

यामुळे सदरच्या आय.एस.ओ. 9001-2015 मानांकनास हस्ती स्कूल पात्र ठरली. यास्तव शाळेला खर्‍या अर्थाने आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झाला आहे.

ही बाब विद्यार्थी, शिक्षक, पालक व दोंडाईचा शहरासाठी अभिमानाची ठरली आहे. व यास्तव हस्ती स्कूलचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

*