Type to search

धुळे

हस्ती बँकेतर्फे ‘सोलर पॉवर सिस्टिम’ कर्ज योजना

Share

दोंडाईचा । दोंडाईचा मुख्यालय असलेल्या व राज्यभर कार्य विस्तारासोबत नावलौकिक प्राप्त, उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य दि हस्ती को ऑफ बँकेतर्फे सोलर पॉवर सिस्टिम कर्ज योजना सुरु केली आहे.

वीज बचत सोबतच प्रदुषण मुक्त वीज निर्मिती करणे ही काळाची गरज आहे. व त्यासाठी पर्यावरण पूरक वीज निर्मितीसाठी सोलर योजना राबविण्याचे सर्वच स्तरावरून प्रयत्न सुरू आहेत. या अनुषंगाने समाजपयोगी विधायक कार्यात आपल्या हस्ती बँकेचाही सहभाग असावा; या उद्देशाने सोलर पॉवर सिस्टिम कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे.

सदरच्या  सोलर पॉवर सिस्टिम कर्ज योजने अंतर्गत कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. यात घरगुती वापराच्या वीज निर्मितीसाठी सोलर पॉवर सिस्टिम बसवणार्‍या सभासदांना पाच लाख पर्यंत व व्यावसायिक ठिकाणी उदा. औद्योगिक युनिट, शोरूम अशा ठिकाणांवर सोलर पॉवर बसवणार्‍या सभासदांना 25 लाखापर्यंत कर्जाचा वित्त पुरवठा बँकेच्या अटी व शर्ती पूर्ण करणार्‍यांना केला जाईल. महत्वाचे म्हणजे या कर्जासाठीचा व्याजदर हा घरगुती सोलर पॉवर सिस्टिमसाठी 9.25 टक्के व व्यावसायिक सोलर पॉवर सिस्टिमकरिता 10.25 टक्के इतका आकारला जाईल. सदरचे व्याजदर हे अत्यल्प व माफक असून सोलर पॉवर सिस्टिम कर्ज योजनेचा लाभ घ्यावा व योजनेच्या अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या हस्ती बँक शाखाधिकार्‍यांशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन हस्ती बँकेतर्फे करण्यात आले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!