हरियाणा : भाजप अध्यक्ष सुभाष बराला यांच्या मुलाला तरुणीच्या अपहरणाच्या गुन्ह्यात अटक

0
चंदिगड पोलिसांनी हरियाणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुभाष बराला यांचा मुलगा विकास आणि त्याच्या मित्राला अटक केली आहे.
गुन्ह्यास पाच दिवस उलटून गेल्यानंतर हि कारवाई करण्यात आली.
दोघांना अपहरणाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात अटक झाली आहे. बुधवारी दोघांविरुद्ध आयएएस अधिकाऱ्यांची मुलगी वर्णिका कुंडूचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाल्याचे कलम लावण्यात आले. ही कलमे जामीनपात्र आहेत. याआधी शनिवारी पाठलाग करणे आणि रस्ता अडवणे असे गुन्हे लावण्यात आले होते. अटकेनंतर त्यांना पोलिस ठाण्यातच जामिनावर सोडण्यात आले.
चंदिगडचे पोलिस महासंचालक तेजेंद्र लुथरा यांनी सांगितले, सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यानंतर विकास ४-५ ऑगस्टच्या रात्री वर्णिकाच्या कारचा पाठलाग करताना दिसला होता. याआधारे त्याच्यावर कलम ३६५ व ५११ लावण्यात आले होते. त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. दोघांवर भादंवि कलम ३५४ ड व मोटार वाहन कायदा १८५ नुसार शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

LEAVE A REPLY

*