हमाल खून प्रकरणी दोघांना अटक

0

नाशिक | दि. ५ प्रतिनिधी- पंचवटीतील मार्केट यार्डाजवळ झालेल्या हमालाच्या खून प्रकरणी पंचवटी पोलीसांनी आज सायंकाळी दोन संशयीतांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये त्याच्या मित्रांचाच सामावेश असून हा खून अनैतिक कारणातून झाल्याचे पोलीस तपासात समोर येत असल्याचे अधिकृत सुत्रांनी सांगीतले.

दीपक दगडू अहिरे (२९, रा़ निलगिरी बाग, औरंगाबाद रोड) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे़ पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार दिंडोरी रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीत हमाल म्हणून कार्यरत असलेल्या दिपक अहिरे याचा अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना शनिवारी (दि ़४) रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली होती.

रात्री अकरा वाजेच्या सुमारास अहिरे आपल्या काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकीने (एम एच १५, सीएच ६३७३) जात असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्या पाठिवर धारदार शस्त्राने वार केले़ यामध्ये अहिरेच्या वर्मी घाव बसल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला व त्याचा मृत्यू झाला़ या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील,

सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार चव्हाण, पंचवटीचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर, पोलीस निरीक्षक सुनील पुजारी आदींसह पोलीस कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला होता. तो पर्यंत हल्लेखोर पसार होण्यात यशस्वी झाले होते.

त्यांच्या शोधासाठी पंचवटी पोलीसांनी विविध पथके तैनात केली होती. आज मिळालेल्या माहितीनुसार पोलीसांनी अहिरे याच्या जवळच्या दोन मित्रांना अटक केली असून खूनाचे कारण अनैतिक असल्याचे समोर येत आहे.

LEAVE A REPLY

*