हनीप्रीत नेपाळमध्ये; उदयपुरातून अटक झालेल्या डेरा सदस्याचा जबाब

0

राम रहीमची खास हनीप्रीत नेपाळमध्ये पळून गेली आहे. उदयपूरहून अटक करण्यात आलेल्या डेरा मेंबर प्रदीप गोयल उर्फ विक्कीने हा दावा केला आहे.

काही दिवसांपूर्वीच पोलिसांना प्रदीपसह हनीप्रीतची लोकेशन उदयपूरच्या एका मॉलमध्ये आढळली होती. याआधारे पोलिसांनी प्रदीपचा माग काढला.

तथापि, दोन साध्वींवरील बलात्कार प्रकरणात राम रहीमला 20 वर्षांची शिक्षा झालेली आहे. शिक्षेच्या सुनावणीवेळी हनीप्रीत त्याच्यासोबतच होती, बाबासह ती तुरुंगापर्यंत हेलिकॉप्टरमध्ये बसून आली होती.

तेथून परतल्यानंतर हनीप्रीतचा ठावठिकाणा लागला नाही. हनीप्रीतवर बाबाला पळून जाण्याचा कट रचणे आणि दंगे घडवून आणण्याचा कट रचल्याचा आरोप आहे.

LEAVE A REPLY

*