स्वित्झर्लंड भारतासह ४० देशांना देणार संशयास्पद खात्यांची माहिती

0

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात नरेंद्र मोदी यांनी विदेशातील काळ्या पैशाचा मुद्दा सातत्याने लावून धरला होता.

सत्तेत आल्यानंतरही स्विस बँकेत दडवून ठेवलेल्या काळ्या पैशांचा माग काढण्यासाठीही सरकारचे अनेक प्रयत्न सुरू होते.

स्वित्झर्लंड सरकारकडून शुक्रवारी यासंदर्भातील एका कराराला मंजूरी देण्यात आली.

मोदी सरकारच्यादृष्टीने हे मोठे यश मानले जात आहे. या करारामुळे आता स्वित्झर्लंडकडून भारताला स्विस बँकेतील संशयास्पद खात्यांची माहिती दिली जाणार आहे.

स्वित्झर्लंडने भारत आणि इतर ४० देशांबरोबर बँकिंगविषयक माहिती आदान-प्रदान करण्याच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. त्यामुळे २०१९ पासून स्वित्झर्लंडमधील भारतीयांच्या बँक खात्यांची माहिती भारताला मिळू शकेल.

स्वित्झर्लंडच्या मंत्रिमंडळाने या विधेयकाला मंजुरी दिली आहे.

या करारात स्वित्झर्लंडकडून गोपनीयता व माहितीच्या सुरक्षिततेसाठी भारतावर काही अटीही लादण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

*