स्वामी विवेकानंद महाविद्यालयातील मुलींचा संघ उपविजयी
Share

जळगाव। वि.प्र. – नुकत्याच धुळे येथे झालेल्या नाशिक विभागीय क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामनामध्ये नाशिक शहर संघाचा विजय झाला तर स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचा संघ उपविजयी ठरला.
उपविजयी संघ- या संघात कर्णधार यशश्री देशमुख, एकता भावसार, संध्या महाजन, विशाका जागीड, भूवनेस्वरी पाटील, दिशा गाजरे, जागृती परदेशी, रोशनी पाटील, सानिका बिर्हाडे,आरती मराठे, जानवी, भारती,प्राची बिर्हाडे, शुभांगी कुमावत यांचा सहभाग होता.या केळाडूंना डॉ.श्रीकृष्ण बेलोरकर, क्रीडा संचालक डॉ.रणजित पाटील, क्रीडा शिक्षक प्रा.सचिन महाजन, पंकज महाजन, सत्नाम बावरी यांचे मार्गदर्शन लाभले. उपविजयी संघाचे केसीई सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, शशिकांत वाडोदकर, प्राचार्य डॉ.यु.डी. कुळकर्णी, एस.ओ.उभाळे, उपप्राचार्य के.जी. सपकाळे, प्रा.प्रवीण महाजन यांनी कौतुक केले.