स्वामी ओमला अटक; दिल्ली क्राइम ब्रॅँचची कारवाई

0

‘बिग बॉस’ या रिअ‍ॅलिटी शोचा सर्वाधिक वादग्रस्त स्पर्धक ठरलेल्या स्वयंघोषित बाबा स्वामी ओम यास दिल्लीच्या इंटर स्टेस सेल क्राइम ब्रॅँचने अटक केली आहे.

स्वामी ओमला भजनपुरा परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे. स्वामी ओमला न्यायालयाने उद्घोषित अरोपी (पीओ) म्हणून घोषित केल्यानंतर क्राइम ब्रॅँचने त्यास अटक केली आहे.

काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात स्वामी ओमला प्रमुख पाहुणे म्हणून बोलविले होते; मात्र लोकांनी कार्यक्रमादरम्यान त्याला चांगलाच चोप दिला होता.

ही घटना दिल्लीतील विकास नगर स्थित सत्यम वाटिकामध्ये आयोजित नथुराम गोडसे जयंती कार्यक्रमादरम्यान घडली होती. या कार्यक्रमात स्वामी ओमला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमात त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानेच लोकांचा पारा चढला होता. अशातही स्वामी ओमने त्याचा तोरा कायम ठेवला. याच कारणामुळे संतापलेल्या लोकांनी त्याला चोप दिला

LEAVE A REPLY

*