Type to search

धुळे

स्वातंत्र्य सेनानी भिलाभाऊ कुंवर यांचे निधन

Share

बोराडी। थोर स्वातंत्र्य सेनानी भिलाभाऊ लकडू कुंवर यांचे ( वय 99 वर्ष ) बोराडी येथील राहत्या घरी आज निधन झाले. तसेच त्यांच्यावर आज बोराडी येथील अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

देशाला परकीयांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी अनेकांनी स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली . त्यापैकी एक असलेले शिरपूर तालुक्यातील विखरण-बोराडी येथील स्वातंत्र्य सैनिक असलेले भिलाभाऊ लकडू कुंवर यांनी वयाच्या 19 व्या वर्षी 1942 च्या स्वातंत्र्य संग्रामात महात्मा गांधी समवेत सहभाग घेवून स्वातंत्र्यासाठी त्यांनी तुंरुगवासही भोगला होता.

कुंवर यांचा जन्म 25 मे 1922 रोजी विखरण येथे झाला. 1933 मध्ये कापडणे येथे शिक्षणासाठी गेले. कापडणे येथील 42 शेतमजुरांना संघटित करून त्यांच्यासह धुळे येथे सत्याग्रह केल्याने, त्यांना एक दिवस व रात्रभर उपाशी ठेवून सोडून देण्यात आले. पुन्हा अटक व्हावी म्हणून त्यांनी धुळे-देवभाने दरम्यान टेलिफोन खांबाची तोडतोड केली. तारा तोडल्या ,रस्त्यावर झाडाच्या फांद्या टाकून रहदारीस अडथळा निर्माण केला. एवढे करून त्यांना अटक झाली नाही. तसेच ते 1955 पासून भिलाभाऊ कुंवर हे बोराडी येथे वास्तव्यास आले होते.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!