स्वातंत्र्य चळवळीवरील बायोपिकमध्ये रणबीर?

0

संजय दत्तवर येणाऱ्या बायोपिकमध्ये रणबीर कपूर मुख्य भूमिका साकारत असून, तो आणखी एका बायोपिकमध्ये दिसण्याची शक्यता आहे.

हा चित्रपट स्वातंत्र्य चळवळीतील प्रमुख व्यक्तींपैकी एक असलेल्या उधम सिंग यांच्या आयुष्यावर आधारित असणार आहे.

दिग्दर्शक शूजित सरकार लैगिक अत्याचारासारखा महत्त्वाचा विषय हाताळल्यानंतर तो पुढच्या चित्रपटासाठी सज्ज झाला आहे. त्याचा पुढचा चित्रपट हा उधम सिंग यांच्या आयुष्यावर असणार असल्याचे त्याने जाहीर केलंय.

उधम सिंग हे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील महत्त्वाचे नाव आहे. स्वातंत्र्य सैनिक असलेल्या उधम यांनी त्यावेळी मायकल अॅडवायरची हत्या केली होती.

१९१९ साली जालियनवाला बाग येथे भरलेल्या शांतता सभेत गोळीबार करण्याचे आदेश त्यावेळी मायकल अॅडवायरने दिले होते. ही भारतीय इतिहासातील एक वाईट घटना होती.

LEAVE A REPLY

*