स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक स्पर्धेत सोहम पहिला

सोहमने काढलेले चित्र ठरले सर्वोत्कृष्ट 

0

नाशिक : नुकतीच मुंबई येथे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाकडून राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.

यास्पर्धेत नाशिकचा सोहम सुरेंद्र देशपांडे पहिला आला असून स्पर्धेमध्ये त्यांने काढलेले चित्र सर्वोत्कृष्ट ठरले आहे. यावेळी प्रशस्तीपत्रक, विजेता चषक आणि पाच हजार रुपये रोख बक्षीस देऊन त्याला गौरविण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे कार्य समजावे आणि त्यांनी प्रेरणा घ्यावी या उद्देशाने स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाकडून वेगवेगळे उपक्रम राबविले जातात.

WhatsApp Image 2017-03-06 at 19.52.49यामध्ये वेगवेगळ्या गटांमध्ये चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या चित्रकला स्पर्धेत न्यू ईरा शाळेत शिकत असलेल्या इयत्ता आठवीतील सोहम देशपांडेने यश मिळविले आहे. स्पर्धेत त्यांने अंदमान : कारागृहाच्या भिंतीवर काव्य लिहिणारे सावरकर या विषयावर चित्र काढले.

कल्पनाशक्ती, स्मरणशक्ती आणि वाचनातून समजलेले सावकर याच्या जोरावर त्याने स्टिपलिंगच्या माध्यमातून हे चित्र रेखाटले. सोहमने काढलेले चित्र १७०० विद्यार्थ्यांमधून सर्वोत्कृष्ट ठरले आहे. सोहम तिसरीत असल्यापासून सुहास जोशी यांच्या व्हीनस आर्ट अॅकेडमीत चित्रकला शिकत आहे.

स्पर्धेसाठी स्पर्धकांना सावरकरांचे साहित्य,ग्रंथ, संदर्भ पुस्तके आणि माहिती वाचण्यासाठी स्पर्धकांना आधी उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यानंतर सावकरांशी संबंधितविषयावर स्पर्धा घेण्यात आली. सोहमच्या चित्रांची निवड करतांना परिक्षकांनी सांगतले की, चित्रातून त्याने स्व:ताचा विचार स्वतंत्र्यपणे रेखाटला असून कुणाचीही नक्कल केलेली नाही.

याशिवाय त्याने स्टिपलिंगच्या माध्यमातु रंगविलेले चित्र हे वैशिष्ट्यपूर्ण ठरत असल्याचे सांगितले. तर सोहमला मुळात चित्रकलेची आवड आहे. एखादे चित्र काढतांना आधी विषय समजून घ्यावा लागतो. त्यानंतर समजशक्तीच्या जोरावर चित्र रेखाटता येते. सोहममध्ये हे गुण असल्यानेच त्याला हे यश मिळाल्याचे त्याला चित्रकला शिकवण्याऱ्या सुहास जोशी सांगतात.

LEAVE A REPLY

*