स्वाईन फ्लूमुळे कोल्हार बुद्रुकच्या शेतकर्‍याचा मृत्यू

0

कोल्हार (वार्ताहर) – कोल्हार बुद्रुक येथेही स्वाईन फ्लू या संसर्गजन्य आजाराने धडक मारली असून गेल्या 15 दिवसांपासून पुणे येथे औषधोपचार घेत असलेले कोल्हार बुद्रुक येथील प्रगतिशील शेतकरी हरिभाऊ अण्णासाहेब खर्डे (वय-56) यांचा उपचार सुरू असताना रविवारी दुपारी 12 वाजता मृत्यू झाला.

खर्डे यांना गेल्या 10 एप्रिल रोजी सर्दी, ताप, खोकला जाणवू लागला. स्थानिक डॉक्टरांकडे त्यांना दाखविण्यात आले. परंतु त्यांना आराम वाटेना म्हणून लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आाले. तेथे त्यांच्या छातीचे एक्सरे काढण्यात  आले.

 

रक्त तपासणी करण्यात आली. एक्सरे पाहिल्यानंतर स्थानिक डॉक्टरांनी त्यांना तातडीने पुणे येथील रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. पुणे येथील रुबी हॉलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले. स्वाईन फ्लूची शक्यता लक्षात घेऊन डॉक्टरांनी त्यांच्या रक्ताचे नमुने घेऊन ते हैदराबाद येथील प्रयोगशाळेत पाठविले. यासंबंधीचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले व स्वाईन फ्लू झाला असल्याचे निदान करण्यात आले.

 

तेव्हापासून त्यांच्यावर पुणे येथील रुग्णालयामध्ये औषधोपचार सुरू होते. शर्थीचे प्रयत्न करूनदेखील उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने काल रविवारी रुग्णालयातच त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. मृत हरिभाऊ खर्डे यांच्या पश्‍चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, तीन बंधू असा परिवार आहे.

 

पद्मश्री डॉ. विखे पाटील साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र खर्डे यांचे ते थोरले बंधू होत. सायंकाळी स्व. खर्डे यांच्यावर कोल्हार बुद्रुक येथील अमरधाममध्ये शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. कोल्हारमध्ये स्वाईन फ्लूमुळे रुग्ण दगावल्याची वार्ता पसरताच परिसरात खळबळ उडाली असून आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. कोल्हार भगवतीपूरमध्ये स्वाईन फ्लूमुळे रुग्ण मृत्युमुखी पडल्याची ही बहुदा पहिलीच घटना असावी.

LEAVE A REPLY

*