स्वाईन फ्लूचे नाशिक जिल्ह्यात 12 बळी ; जिल्हा रूग्णालयात 9 जणांवर उपचार

0

नाशिक : जिल्ह्यामध्ये स्वाईन फ्लूचा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. जिल्हा रूग्णालयात दोन स्वाईन फ्लू संशयीतांचा आज मृत्यू झाला आहे. यामुळे मागील तीन महिन्यात जिल्ह्यात स्वाईन फ्लू बळींची संख्या 12 वर पोहचली आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या स्वाईन फ्लू कक्षामध्ये आज शहरातील भगूर येथील दशरथ मुरलीधर सुर्यवंशी या रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर निफाड येथील एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे. यामुळे मागील 15 दिवसात जिल्हा रूग्णालयात स्वाईन फ्लू बळींची संख्या 3 तर एकुण जिल्हयातील बळींची संख्या 12 झाली आहे.

दरम्यान स्वाईन फ्लू कक्षातून उपचार पुर्ण झाल्याने दोघांना घरी सोडण्यात आले तर आज सिन्नर येथील मुलगा आणि वडिलांची यात भर पडली असूनया कक्षातील संख्या 9 वर पोहोचली आहे. यामध्ये 7 पुरूष व दोन महिलांचा सामावेश आहे.

यामध्ये पंचवटी, इंदिरानगर व अंबड, चुंचाळे या परिसरातील रुग्णांचा समावेश आहे. तर 6 रुग्ण हे जिल्ह्यातील सिन्नर, सटाणा, कळवण, मालेगाव, इगतपुरी, नांदगाव येथील आहेत. दरम्यान यापुर्वी दाखल असलेल्या रूग्णांचे पुणे येथील प्रयोगशाळेतून अहवाल जिल्हा रूग्णालयाला प्राप्त असून दाखल असलेल्या रूग्णांपैकी 4 जणांचा अहवाल पॉझीटीव्ह आला आहे.

जिल्ह्यातील विवध शासकीय रूग्णालयांमध्ये मागील वर्षभरापासून आतापर्यंत 24 हजार 502 तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये 8 रूग्ण संशयास्पद आढळून आले. जिल्हा रूग्णालयात

LEAVE A REPLY

*