Type to search

धुळे

स्वयंपाक घरात घुसून महिलेचा विनयभंग

Share

धुळे । तालुक्यातील मौजे तरवाडे गावात एकाने दारुच्या नशेत महिलेच्या स्वयंपाक घरात घुसून तिचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना घडली आहे. याप्रकरणी मद्यपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तालुका पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

याबाबत पिडीत 31 महिलेने धुळे तालुका पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार दि. 10 रोजी सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास राजेंद्र भादू पवार (वय 42) रा.तरवाडे हा दारुच्या नशेत घरात घुसला. महिला स्वयंपाक घरात एकटी असतांना त्याने तिचा हात धरला. पोलिसात तक्रार केली तर तुझ्यासह मुलीला त्रास देईल, अशी धमकी दिली. मात्र त्या महिलेने घराबाहेर पळ काढला, असे फिर्यादीने म्हटले आहे. याप्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात राजेंद्र पवार याच्याविरूध्द भादंवि कलम 354 (ब), 452 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!