स्वच्छतेत शहराचा क्रमांक निश्चितच वर आणू

0

भुसावळ / अस्वच्छ शहरांच्या यादीत भुसावळचा दुसरा क्रमांक येणे ही शहरासाठी लाजीरवाणी बाबा आहे.

या सर्वेक्षणात लावण्यात आलेल्या निकषांची शहरात पूर्तता नसल्याने ही परस्थिती उद्भवली आहे.

यासाठी आवश्यक यंत्रणांची मागील काळात पूर्तता न झाल्याने सद्या हालाकीची परिस्थिती निर्माण झाली आहे.

शहराची स्वच्छता व सर्वांगिण विकासासाठी प्रयत्न सुरु केले असून आगामी काळात स्वच्छतेबाबत शहराचा क्रमांक निश्चितच वर आलेला असेल त्यासाठी प्रयत्न पालिकेमार्फत घेण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष रमण भोळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पालिकेच्या नगराध्यक्षांच्या दालनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

नगराध्यक्ष रमण भोळे यांनी सांगितले की, पालिकेची निवडणूक पार पडल्यानंतर महिनाभर सत्तापूर्वीच्या पदाधिकार्‍यांच्या हातात होती.

पदवीधर मतदार संघ निवडणूक आचारसंहितेत 25 दिवस, जि.प. व पं.स. निवडणूकीत 20 दिवस गेले तर स्वास्थ्य ठिक नसल्याने मुख्याधिकारी सुटीवर होते, असा बराच वेळ सत्ता हातात आल्यापासून वाया गेला आहे.

काम करण्यासाठी फक्त दीड महिनाच मिळाला आहेे. शहराच्या सार्वांगिण विकासासाठी पालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेतील 13 कोटी रुपयांचे विकास कामे तांत्रीक मंजुरीसाठी पाठविली आहे.

यात संपूर्ण 24 प्रभागातील कामांचा समावेश आहे. मात्र विरोधकांकडून ही मिटींग रद्द करण्याबाबत जनआधारच्या नेत्यांच्या सुचनेवरुन नगरसेवकांनी जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी केली आहे.

या ठरावांमध्ये शहरातील मुख्य रस्ते, स्वच्छतेसाठी आवश्यक गटारींची कामे मोठ्या प्रमाणात आहे.

स्वच्छतेसाठी 6 ट्रॅक्टर, घंटागाडी, कचरापेटी, हातगाड्या, कामगारांचे साहित्य, सार्वजनिक शौचालय दुरुस्ती तेथे पाण्यासाठी बोअरवेलची व्यवस्थांच्या विषयांना स्थाई समितीच्या बैठकीत मंजुरी दिली असल्याचे सांगितले.

विरोधी जनआधार विकास पार्टीकडून शहराच्या विकासात खिळ घालण्यासाठी मुख्याधिकार्‍यांना टार्गेट करण्यात येत आहे. त्यांना शहराचा विकास व्हावा असे वाटत नाही.

मुख्याधिकार्‍यांना त्रास दिल्याने ते कामात निष्क्रिय होऊन बदली केली तर विरोधक आपले दुषित हेतू साध्य करण्यासाठी खोट्या तक्रारी करीत आहे. मुख्याधिकारी कर्तव्यदक्ष आहे.

विरोधकांचे प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही. सत्ताधारी मुख्याधिकारी यांच्या पाठिशी असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*