गाडगेमहाराज पुलावरील कचरा हटणार तरी कधी? स्वच्छतेत नाशिकचा क्रमांक खाली

0

पंचवटी, दि. ४ : शहराची स्मार्ट नाशिककडे वाटचाल सुरू असतानाच शहरातील मध्यवर्ती भागातील कचरा समस्या वाढत आहे.

पंचवटीतील गाडगेमहाराज पुलावर गेल्या अनेक महिन्यांपासून परिसरातील नागरिक कचरा टाकत असून दररोज येथे कचऱ्याचे ढीग दिसतात.

पूर्वी या ठिकाणी निर्माल्य कलश होता. मात्र मध्यंतरी तोही ‘गायब’ झाला. त्यामुळे नदीत निर्माल्य टाकायला येणारे नागरिक येथेच कचरा टाकताना दिसत आहेत.

गोदावरी स्वच्छतेसाठी एकाबाजूला सुरक्षा पथक नेमणाऱ्या महापालिकेला जवळच असलेल्या पुलावरील कचऱ्याचा मात्र विसर पडल्याचे प्रकर्षाने जाणवते.

येथील कचरा त्वरित हटवावा आणि येथे कचरा टाकणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.

दरम्यान केंद्र सरकारने केलेल्या स्वच्छता पाहणी अहवालात नाशिकचा क्रमांक पहिल्या शंभरमध्येही नसल्याचे स्पष्ट झाले आहे. स्वच्छतेच्या बाबतीत नाशिकचा क्रमांक १५१ वा आहे.

LEAVE A REPLY

*