‘स्मार्ट सिटी’साठी नाशिकला १३७ कोटी

0

नाशिक | दि. ४ प्रतिनिधी- केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ङ्गस्मार्ट सिटीफ अभियानात नाशिकची निवड झाल्यानंतर यासंदर्भातील एसपीव्ही नियुक्त झाली आहे.

नाशिक म्युनिसिपल डेव्हल्पमेंट कॉर्पोरेशन स्थापनाही करण्यात आली आहे. ङ्गस्मार्ट सिटीफच्या कामास वेग मिळावा म्हणून केंद्र व राज्य सरकारकडून महापालिकेला १३७ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. हा निधी नाशिक म्युनिसिपल डेव्हल्पमेंट कॉर्पोरेशनच्या खात्यात वर्ग होणार आहे.

ङ्गस्मार्ट सिटीफ अभियानात नाशिक महापालिकेची निवड झाल्यानंतर राज्य व केंद्र पातळीवरुन या कामास प्रारंभ झाला आहे. या अभियानांतर्गत नाशिकला पाच वर्षात १ हजार कोटींचा निधी मिळणार आहे. केंद्र सरकार ५० टक्के, राज्य शासन २५ टक्के तर महापालिकेचे २५ टक्के अशा प्रमाणात हा निधी उभारला जाणार आहे.

दरवर्षी शहरविकासासाठी या अभियानातून २०० कोटींचा खर्च केला जाणार आहे. यासाठी पहिला हप्ता म्हणून केंद्र सरकारकडून ९० कोटी तर राज्य सरकारकडून ४५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

हा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नाशिक म्युनिसिपल डेव्हल्पमेंट कॉर्पोरेशनच्या खात्यात वर्ग केला जाणार आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारने ङ्गस्मार्ट सिटीफच्या प्रशासकीय कामकाजासाठी २ कोटी रुपयांचा निधी आधीच मंजूर केला आहे.

हा निधी देखील महापालिकेच्या महामंडळाकडे वर्ग केला जाणार आहे. केवळ ङ्गस्मार्ट सिटीफकरताच हा हा निधी खर्च केला जाणार आहे.

LEAVE A REPLY

*