स्मार्ट गर्ल कार्यशाळेला स्मार्ट प्रतिसाद

0

जैन संघटना, मुनोत ट्रस्टचा पुढाकार

अहमदनगर (प्रतिनिधी)– 21 व्या शतकात आधुनिक साधने, प्रगती, विकास झाला असला तरी सर्व समाजात मुलींच्या, युवतींच्या सुरक्षिततेचा प्रश्न कायम असून पूर्वीच्या काळापेक्षाही भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. आज सर्वच क्षेत्रात महिला, युवती कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांना घराबाहेर पडावेच लागते. अशा मुलींना या कार्यशाळेतून सक्षम बनविणे, त्यांच्यात धाडस निर्माण करून पालकांशी, इतरांशी संवाद कसा साधावा, नैराश्यापासून मुक्त कसे व्हावे, याचे ज्ञान हसत खेळत देण्यासाठी स्मार्ट गर्ल, युवती सक्षमीकरण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संजय क्षीरसागर यांनी दिली.
भारतीय जैन संघटना नगर शाखेतर्फे पी. एम. मुनोत ट्रस्टच्या सहकार्याने स्मार्ट गर्ल, युवती सक्षमीकरण कार्यशाळा शनिवारी पारपडली. कार्यशाळेचे दीप प्रज्वलन मुनोत ट्रस्टचे शरद मुनोत यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी मीनाताई मुनोत, महिला अध्यक्षा प्रितम राका, अरुणा क्षिरसागर, शर्मिला गुगळे, प्रियांका चंगेडीया, सुवर्णा डागा, नूतन फिरोदिया, अल्पना कासवा, डॉ. दिपा भळगट, माधवी गांधी, अर्चना बाफना, ऋति पितळे, कविता मुनोत, ज्योती बोथरा, अर्चना सोळंकी, आदेश चंगेडीया आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मुनोत म्हणाले की, भारतीय जैन संघटनेच्या नगर शाखेने गेल्या तीन वर्षांत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले असून समाजाची खरी गरज ओळखून त्यांचे कार्य सुरु असते. त्यांच्या या कार्यास सतत सहकार्य राहील. मीनाताई मुनोत यांनी कार्यशाळेतील मुलींनी स्वतःला सक्षम करण्यासाठी मनापासून सहभागी होण्याचे आवाहन केले. स्मार्ट गर्ल उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला.
राज्य शासनाच्या मान्यतेने एम्पॉवरमेंट ऑफ गर्ल्स अभियानात स्मार्ट गर्ल प्रकल्प नगर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 925 शाळांमध्ये राबविण्यात येत आहे. मुलींना सक्षम करताना त्यांना स्वसंरक्षणाचे धडे देणे, त्यांना मानसिकदृष्ट्या कणखर करणे, भारतीय संस्कृतीची जाणीव करून देणे तसेच पालक आणि पाल्यांचा संवाद याबाबत अतिशय उत्तम असा कार्यक्रम अभियानात आखण्यात आला आहे. कार्यशाळेत जैन समाजातील 13 ते 25 वर्षे वयोगटातील मुली, अविवाहित युवतींना प्रशिक्षण देण्यात येत आहे.
तसेच आदेश यांनी उपस्थितांचे आभार मानले. सूत्रसंचालन कल्पना कासवा यांनी केले. यावेळी भारतीय जैन संघटना व महिला शाखेचे सर्व पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.

जैन संघटना नगर शाखेचे अध्यक्ष चंगेडीया यांनी मूल्यवर्धन प्रकल्पाविषयी माहिती दिली. शासनाने 1 ली ते 4 थीच्या अभ्यासक्रमात याचा समावेश केला आहे. संस्कार व प्रामाणिकपणावृद्धी होऊन नवी आदर्श पिढीची निर्मिती होईल असे सांगितले. जैन मुलींना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी या कार्यशाळेत 60 युवतींना समाविष्ठ केले असून उर्वरित युवतींसाठी हाच उपक्रम पुढील दोन महिन्यांत राबविण्यात येईल असे सांगितले.

LEAVE A REPLY

*