स्मार्टफोनची किंमत 2.3 कोटी रुपये!

0

हल्ली स्मार्टफोनही ‘स्टेटस सिम्बॉल’ झाल्याने काहींच्या किमती अशा वाढलेल्या आहेत.

या स्मार्टफोनची किंमत तब्बल 2.3 कोटी रुपये आहे. लग्झरी फोन कंपनी ‘वर्तु’ने हा ‘सिग्नेचर कोब्रा’ फोन आणला आहे.

एका चायनीज ई-कॉमर्स वेबसाईटवर त्याची विक्री सुरू असली तरी हे फोन मर्यादित संख्येत आहेत. या फोनचे केवळ आठ युनिट बनवले आहेत.

चीनमध्ये त्याचे केवळ एक युनिट आहे. या फोनच्या 388 भागांना हातानेच बनवण्यात आले असून ही निर्मिती इंग्लंडमध्ये झाली आहे.

फ्रान्सच्या एका ज्वेलरी ब्रँड ‘बूशरोन’ने त्याचे डिझाईन बनवले आहे.

या स्मार्टफोनवर 439 माणिक जडवले आहेत. फोनच्या बॉडीचा आकार एखाद्या नागासारखा आहे. त्यामध्ये दोन पाचू जडवले आहेत.

फोनची स्क्रीन 2 इंचाची असून तिचे रिझोल्युशन 240 बाय 320 आहे. यामध्ये टू जीबी रॅम आणि 16 जीबी इंटर्नल मेमरी आहे. फोनची बॅटरी 5.5 तासांचा बॅकअप देते.

डिस्प्लेवर सफायर क्रिस्टल लावले आहेत.

LEAVE A REPLY

*