स्थायी सदस्य निवड बेकायदेशिर ; विरोधकांचा आरोप

0

नाशिक : महानगरपालिका सदस्य निवडीची प्रक्रिया राबवितांना आरपीआय (आठवले गट) नगरसेविक दीक्षा लोंढे यांना शिवसेनेसोबत सहायोगी सदस्य आहे कि स्वतंत्र गटनोंदणी केली हे स्पष्ट झालेले नाही, त्यांना त्यांच्या पक्षाचे गटनेता म्हणुनही जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे 121 नगरसेवकांच्या तौलानिक बळानुसारच स्थायी निवड प्रक्रिया झाल्याचा आरोप विरोधकांनी करित ही निवड बेकायदेशिर असल्याचा आरोप केला आहे.

महापौर निवडीनंतर महापालिकेतील सर्वच विरोधकांनी एकत्र येत अपक्ष असलेल्या चार सदस्यांना प्रत्येकी एक – एक सदस्यांना बरोबर घेऊन सहयोगी सदस्य म्हणुन गटनोंदणी करुन स्थायी सदस्य निवडीत सत्ताधारी भाजपाला खिंडीत गाठण्यासाठी व्युहरचना केली होती.

त्यानुसार तीन अपक्षांची सहयोगी सदस्य म्हणुन गटनोंदणी झाली. शेवटी सेनेसोबत आरपीआयच्या दीक्षा लोंढे यांची सहयोगी सदस्यकरिता गटनोंदणीचा प्रस्ताव विभागींय आयुक्तांनी फेटाळला. यात निकालपत्र देण्यात विलंब झाल्यानंतर शिवसेनेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

या याचिकेवर आज सुनावणीत आजच्या विशेष महासभेला स्थगिती मिळावी अपेक्षा होती. त्यानुसार आज विरोधकांकडुन महासभा लांबविण्याचा प्रयत्न सुरू होता. यामुळे शिवसेना व कॉग्रेस पक्षानी महापौरांनी सकाळी बोलविलेल्या गटनेता बैठकीस गैरहजेरी लावली. त्यानंतर महासभा सुरू झाल्यानंतर विरोधकांनी नावे देण्यात वेळ देण्याची मागणी करतांनाच दीक्षा लोंढे यांच्या सहयोगी सदस्य नोंदणीचा मुद्दा उपस्थित करित यासंदर्भात खुलासा करण्याची मागणी केली.

न्यायालयाकडुन काहीतरी निर्णय येईल याकरिता महासभा लांबविण्याचा विरोधकांचा हा डाव लक्षात आल्यानंतर महापौरांनी तात्काळ पक्षांकडुन स्थांयी सदस्य म्हणुन आलेले नावे जाहीर जाहीर करु टाकले. महासभा संपवित विरोधकांना गडबड गोंधळ करण्यात वेळ दिला नाही. त्यामुळे विरोधकांवर सत्ताधारी भारी पडल्याचे सभागृहात दिसले.

महासभेनंतर विरोधकांकडुन सत्ताधार्‍यांवर दडपशाहीचा आरोप करण्यात आला. दीक्षा लोंढे या आरपीआय (आठवले गट)च्या एकमेव सदस्य असल्याने त्यांना त्यांच्या पक्षाचे गटनेते म्हणुन घोषीत करण्यात आलेले नाही आणि त्यांना शिवसेनेसोबत सहयोगी सदस्य म्हणुन धरण्यात आलेले नाही. त्यामुळे आजच्या महासभेत हा मुद्दा विरोधकांकडुन लावून धरण्यात आला आहे. मात्र विरोधकांना साईडट्रॅक करीत सत्ताधार्‍यांनी सदस्य निवड जाहीर करीत महासभा संपविली.

LEAVE A REPLY

*