स्थायी सदस्य निवडणुकीत नगरसेवकाचा भाऊ पिस्तुल आणतो तेव्हा…

0

नाशिक : नाशिक महापालिकेत आल स्थायी सदस्यांची निवड पार पडली. यादरम्यान नगरसेवक भावाने चक्क कंबरेला पिस्तुल लाऊन मनपात प्रवेश केला. त्यामुळे सभागृहासह सर्वच ठिकाणी आज हा चर्चेचा विषय ठरला होता.

दरम्यान, या कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. बंदुक कमरेला लावून फिरणाऱ्या या कार्यकर्त्याचे नाव राहुल आरोटे असल्याचे समजते.

राहुल आरोटे हा नगरसेवक भागवत आरोटे यांचा भाऊ आहे. राहुल आरोटे कमरेला बंदुक लावून महापालिका परिसरात फिरत होता.

हा कार्यकर्ता एव्हढ्यावरच थांबला नाही तर पुढे स्थायी सदस्य निवडीवेळी महापालिकेत बाऊन्सर्सच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन देखील त्याने केले.

दरम्यान, महापालिकेतील पोलीस यंत्रणा अशा कार्यकर्त्यांना घाबरून जातात म्हणून त्यांना कोणी अडवत नाही. अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

भाजपचा कार्यकर्ता असल्याची प्राथमिक माहिती आहे.

LEAVE A REPLY

*