‘स्थायी’साठी भाजपा – सेनेत चुरस

0

नाशिक | दि.४ प्रतिनिधी- महापालिकेच्या महापौर-उपमहापौर पदाबरोेबर स्थायी सदस्य निवडीचा कार्यक्रम प्रशासनाने जाहीर केला असुन स्थायीवर वर्णी लागावीत याकरिता भाजपा, सेना व कॉग्रेस आघाडीकडुन चढाओढ सुरू झाली आहे. स्थायी समितीवर पक्षीय बळानुसार भाजपा ९, शिवसेना ५ व कॉँग्रेस आघाडी एकत्र आल्यास २ असे १६ सदस्य निवडून जाणार आहे. त्यामुळे भाजपा व सेनेत स्थायीवर जाण्यास मोठी चुरस निर्माण झाली आहे.

येत्या १४ मार्च रोजी सकाळी ११ वाजता महापौर-उपमहापौर पदासाठी राजीव गांधी भवन मुख्यालयातील सभागृहात निवडणूक घेण्यात येणार आहे. या निवडणुक विशेष महासभेला पिठासन अधिकारी म्हणुन जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन् हे उपस्थित राहणार आहे. महापौर व उपमहापौर निवड झाल्यानंतर नवनिर्वाचित महापौरांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीच्या १६ सदस्य नियुक्तीचाही प्रस्ताव महापालिकेच्या नगरसचिव विभागाने विशेष महासभेत ठेवला आहे. मात्र, त्याच दिवशी स्थायीची निवड प्रक्रिया न ही निवड काही दिवस ढकलण्याची तयारी भाजपाकडुन करण्यात आली आहे. हा निर्णय मात्र नवीन महापौर घेणार आहे.

महापालिकेतील १२२ सदस्यात भाजपाचे ६६ सदस्य, शिवसेना ३५ , कॉँग्रेस ६ , राष्ट्रवादी ६ , मनसे ५, अपक्ष ३ आणि रिपाइं १ असे पक्षीय संख्याबळ आहे. स्थायी समितीवर १६ सदस्य नियुक्त केले जातात. महापालिकेची एकूण सदस्य संख्या १२२ असुन १२२ भागीले १६ यानुसार प्रती सदस्य नियुक्तीसाठी ७.६२ चा कोटा आहे. त्यामुळे भाजपाचे सर्वाधिक ९, तर शिवसेनेचे ५ सदस्य स्थायी समितीवर जाणार आहे. यामुळे भाजपा व शिवसेनेत स्थायीवर जाण्यासाठी नगरसेवकांत मोठी चढाओढ लागली आहे.

यात जुन्या नगरसेवकांबरोबर इतर पक्षांतून भाजपात अलीकडेच दाखल झालेल्या नगरसेवकांचा समावेश आहे. याकरिता प्रदेश पातळीपर्यत फिल्डींग लावळी गेली आहे. यामुळेच मोठी चुरस सुरू झाली आहे. कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉग्रेस असे मिळून १२ सदस्य निवडुन आले आहे. या दोन्ही पक्षांनी निवडणूकपूर्व आघाडी केलेली होती. त्यांनी एकत्रीत गट नोंदणीही केली तर त्यांचे २ सदस्य स्थायीवर जाऊ शकतात. तर मागील सत्ताधारी महाआघाडीतील मनसेनेचे सर्वाधिक चार सदस्य स्थायीवर निवडुन जात होतेे. आता मात्र मनसेना व अपक्ष यांचे संख्याबळ पाहता त्यांचा एकही सदस्य स्थायीवर जाणार नाही.

LEAVE A REPLY

*