स्थानिक समस्या सोडवणारा नगरसेवक हवा !

0

चेतन इंगळे,मोदलपाडा । तळोदा शहरात अनेक नगरसेवक होऊन गेलेत. मात्र, आता कोणत्याही प्रभागात उमेदवार नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर त्याने वेळेवेळी आपल्या प्रभागात जाऊन स्थानिक समस्या सोडवल्या पाहिजे असे मतदारांचे स्पष्ट मत आहे. याबाबत नेत्यांनीदेखील याची नोंद घेणे आवश्यक आहे.

नगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला आता चांगलाच वेग आला आहे. अद्याप तरी जाहीर सभा होत नसल्याने प्रचाराची खरी रणधुमाळी सुरू झालेली नाही.

प्रभागातील उमेदवार निवडून आल्यानंतर त्याने वेळोवेळी आपल्या प्रभागात जाऊन स्थानिक समस्या सोडवल्या पाहिजे असे अनेक प्रभागातील मतदारांचे स्पष्ट मत असल्याचे बोलले जात आहे.

यामध्ये नेत्यांनीदेखील याची नोंद घेणे आवश्यक आहे. तळोदा शहरातील मतदारांना आता विकासाची खूपच अपेक्षा आहेत.

आम्ही दरवेळी मतदान करून प्रभागाच्या विकासाची स्वप्न पाहतो पण निवडून आल्यानंतर उमेदवार प्रभागाचा विकास तर दूरच साध तोंडसुद्धा दाखवायला येत नाही.

म्हणून आता नुसता नगरसेवक पद मिरवणारा उमेदवार नको तर वेळेवेळी प्रभागामध्ये जाऊन लोकांच्या समस्या जाणून ते सोडवणारा नगरसेवक पाहिजे असे प्रत्येक प्रभागातील मतदार बोलायला लागले आहेत.

तळोदा शहरात सर्वच पक्षांकडून आपापल्या प्रभागात प्रचारातून शक्तीप्रदर्शन दाखवत लोकांवर छबी पडण्याचा प्रयत्न होतो आहे. मतदार उमेदवारांचे हावभाव, मागील इतिहास, सोबत कोण यावर, बारीक लक्ष ठेवून चर्चा करू लागला आहे.

हा किती चांगला तो किती वाईट यावर चर्चा करून आपले मत मांडत आहेत. निवडणुकीच्या प्रचाराने जोर धरला आहे. ध्वनीक्षेपकाबरोबरच वासुदेवची टीम, जादूगार, डिजिटल व्हॅन, रिक्षा, या सर्वच मतदारांचे लक्ष वेधून घेत आहेत.

सर्वच राजकीय पक्षांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. तसेच काही प्रभागांमध्ये मध्ये पतीराज आपल्या पत्नींसाठी दारोदारी पायपीट करत करत आहेत.

अनेक वर्ष विकासाचे मोठे स्वप्न निवडणुकीत मतदारांना दाखवले जाते. निवडणूक आली की मतदारांना लोटांगण घालायचे व नंतर निवडून झाली व निवडून आल्यानंतर पाच वर्षे त्या प्रभागाचा विकास न करता भकास परिस्थिती पहायला मिळते.

परंतु आता मतदार राजा हुशार झाला आहे. अश्या उमेदवारांना मतदार नाकारतील व आता जो उमेदवार प्रभागामध्ये येऊन समस्या सोडवेल त्यालाच मतदार राजा निवडून देणार असल्याचे बोलले जात आहे.

शहरात लोकांना स्टार प्रचारकांच्या सभांची प्रतीक्षा लागूनच आहे. अद्यापपर्यंत एकही पक्षाने जाहीर सभा किंवा स्टार प्रचारक आणलेले नाही. फक्त रात्रीच्या बैठकांवर अधिक भर दिला जात आहे.

दिवसभर प्रचार रॅली व कॉनर सभा घेतल्या जात असतील परंतु खरी राजकीय व्यूहरचना ही रात्री होणार्‍या नेत्यांच्या बैठकीत ठरत असते. सर्वच राजकीय पक्षांचे सूत्र हे त्या त्या पक्षाच्या प्रचार कार्यालयातून हलवली जात आहे.

निवडणुकीत भाजपा काँग्रेस हे दोनही पक्ष विकासाचा मुद्दा वापरत आहे. दोन्ही बाजूने आपण विकास कामे केली असल्याचे सांगितले जात आहे. मात्र हा मुद्दा आता शहरातील मतदारांना कितपत आकर्षित करण्यात यशस्वी ठरतो हे येणार्‍या काही दिवसातच कळणार आहे.

LEAVE A REPLY

*