स्तनपान सप्ताहांतर्गत गरोदर मातांचा ओटीभरण करुन सन्मान

0

नेवासा (तालुका प्रतिनिधी) – एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पाच्यावतीने नेवासा गटाअंतर्गत स्तनपान सप्ताह निमित्ताने कार्यक्रम काल पार पडला. यावेळी स्त्री जन्माचे स्वागतासह गरोदर मातांचे ओटीभरण करुन पंचायत समितीच्या सभापती सौ. सुनीताताई गडाख यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. बाळासाठी मातेचे दूध हे अमृतासमान असल्याने गरोदर मातांनी सकस आहार घ्यावा असे आवाहन सौ.गडाख यांनी यावेळी केले.

 

नेवासा खुर्द जिल्हा परिषद शाळा प्रांगणात स्तनपान सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात सौ. गडाख अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या.

 

 

नगरसेविका सौ. अंबिका ईरले, बालविकास प्रकल्प अधिकारी सुनील अंकुश, डॉ. रेणुका जोशी, प्रभारी गटशिक्षणाधिकारी विलास साठे, शालेय पोषण आहार विभागाच्या अधिक्षिका हेमलता गलांडे, श्रीमती शिला नाईक, नेवासा गटाच्या पर्यवेक्षिका संचिता नजन व्यासपिठावर होत्या.

 

 

सौ.सुनिताताई गडाख यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. सकस आहार प्रदर्शनाचे उदघाटनही त्यांच्या हस्ते झाले. गरोदर मातांचा ओटीभरण कार्यक्रमाद्वारे सौ.गडाख यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.तसेच स्त्रीजन्माच्या स्वागत प्रसंगी बालिकांचा गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला.

 

बालविकास प्रकल्प अधिकारी सुनील अंकुश यांनी स्तनपान सप्ताह निमित्त तालुक्यात बालविकास प्रकल्पाच्या वतीने अंगणवाडीच्या मार्फत राबविलेल्या उपक्रमाची माहिती दिली.

 

 

यावेळी डॉ. रेणुका जोशी, शिला नाईक यांनी स्तनपानाचे महत्व, चौरस आहार याविषयी मार्गदर्शन केले. कवि दशरथ शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. नेवासा गटातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, मातापालक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या

LEAVE A REPLY

*