स्टेट बँकेत कर्ज प्रकरण मंजूर होत नसल्याने भुसावळात विभागीय व्यवस्थापकावर हल्ला

0

भुसावळ |  प्रतिनिधी :  कर्ज प्रकरण पास होत नसल्याने भुसावळ येथील सहकार नगरातील सागर पॅलेस मधील चौथ्या मजल्यावर राहणारे व भारतीय स्टेट बँक शाखा जळगाव येथे रिजनल मॅनेजर म्हणून कार्यरत असलेले प्रकाश मधुकर पाठक यांच्या सागर पॅलेस येथील निवासस्थानी अनधिकृत जावून प्रकाश पाठक यांच्या अंगावर चौघेजण धावून गेले व त्यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. प्रकाश पाठक यांच्या वाचविण्यास त्यांचा मुलगा आदित्य व त्याची आई सौ.ज्योती पाठक हे गेले असता चौघांपैकी एकाने घरातील टिपॉय वरील काच काढून आदित्यच्या डोक्यावर मारली. यात त्याच्या हाताला देखील लागल्याने घरात सर्वत्र रक्ताचा सडा पडला.

या मारहाणीत पाठक कुटूंब जखमी होवून त्यांनी प्रचंड घाबरलेल्या मनस्थितीत शहर पो.स्टे. गाठले. ही खळबळजनक घटना मराठी नुतन वर्षाचा पहिला दिवस पाडवा साजरा केला जात असतांना सायंकाळी ७ वाजता घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

घटनेबाबत पोलिस उपअधिक्षक श्री.निलोत्पल यांनी दिलेली माहिती अशी की, येथील सहकार नगरमधील सागर पॅलेसच्या चौथ्या मजल्यावर राहणारे व भारतीय स्टेट बँक शाखा जळगाव येथे रिजनल मॅनेजर म्हणून काम करणारे प्रकाश मधुकर पाठक हे त्यांच्या परिवारासह राहतात. प्रकाश पाठक यांच्याकडे कर्ज प्रकरण पास करणे अथवा अपुर्‍या कागदपत्रांवरून नाकारणे हे काम आहे. त्यांनी कर्ज पास केले नाही

यामुळे राहुल उर्ङ्ग बाळू डिगंबर सोनवणे, रेवतकुमार सतीश सपकाळे, प्रेम तिवारी व एक अज्ञात असे चौघे दि.२८ मार्च १७ रोजी सायंकाळी ७ वाजता प्रकाश पाठक यांच्या घरात अनाधिकारे घुसले व त्यांच्या अंगावर जावून मारहाण करू लागले.

प्रकाश पाठक यांना मारहाण झाल्यानंतर घरात साचलेला रक्ताचा थारोळा.
प्रकाश पाठक यांना मारहाण झाल्यानंतर घरात साचलेला रक्ताचा थारोळा.

यावेळी घरात असलेल्या त्यांचा मुलगा आदित्य प्रकाश पाठक व त्याची आई सौ. ज्योती प्रकाश पाठक हे प्रकाश पाठक यांना सोडविण्यासाठी धावले असता या चौघे हल्लेखोरांपैकी एकाने पाठक यांच्या घरातील टीपॉय वरील काय ङ्गोडून आदीत्यच्या डोक्यावर व हातावर मारली.

तसेच प्रकाश पाठक व त्यांची पत्नी ज्योती पाठक यांना देखील मारहाण केली. या हल्ल्यात आदित्यच्या डोक्यातून व हातातून रक्त वाहू लागल्याने घरात सर्वत्र रक्ताचा सडा पडला होता. हल्ला करून हल्लेखोर गेल्याने पाठक कुटूंबिय प्रचंड दहशतीखाली आले.

शहर पोलिस ठाणे गाठून आदित्यला उपचारार्थ डॉ.निलेश महाजन यांच्या साईपुष्प ऍक्सिडेंट हॉस्पीटल येथे दाखल करण्यात आले. तेथे त्याच्या डोक्याला पाच व हाताला आठ टाके पडल्याचे समजते. तसेच हल्लेखोरांमधील रेवतकुमार सपकाळे व राहुल उर्ङ्ग बाळू सोनवणे हे देखील जखमी अवस्थेत पोलिस ठाण्यात आल्याने त्यांना जळगाव सामान्य रूग्णालयात उपचारार्थ पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले.

महाराष्ट्रात पाडवा व मराठी नुतन वर्षाचा पहिला दिवस साजरा होत असतांना प्रकाश पाठक यांच्या घरात घुसून त्यांच्या परिवारावर प्राणघातक हल्ला झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यात गंभीर जखमी झालेल्या आदित्यचा दि.२८ रोजी वाढदिवस असल्याचे समजते. या घटनेत प्रकाश पाठक व त्यांची पत्नी हे दोन्ही देखील किरकोळ जखमी आहेत.
घटनेचे वृत्त कळताच शहर पोलिस ठाण्याला पोलिस उपअधिक्षक श्री.निलोत्पल यांनी धाव घेतली.

तसेच नगरसेवक प्रमोद नेमाडे, परिक्षित बर्‍हाटे, अमोल इंगळे, भाजपा शहराध्यक्ष पुरूषोत्तम नारखेडे, ब्राह्मण संघाचे अध्यक्ष रघुनाथ मांडळकर, सचिव दिपक अडावदकर, प्रकाश केर्‍हाळकर, श्री.दुबे, सोनु मांडे, कैलास उपाध्याय यांच्यासह असंख्य लोकांनी शहर पोलिस ठाणे गाठले.

जखमी प्रकाश पाठक व त्यांची पत्नी ज्योती पाठक यांच्याकडून पोलिस उपअधिक्षक निलोत्पल यांनी सविस्तर खरी माहिती जाणून घेवून सौ.ज्योती प्रकाश पाठक यांनी दिलेली ङ्गिर्याद घेतली. यावेळी शहर पो.स्टे.चे पोनि वसंतराव मोरे उपस्थित होते. रात्री उशिरापर्यंत सौ.ज्योती पाठक यांच्या ङ्गिर्यादीवरून शहर पो.स्टे.ला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

LEAVE A REPLY

*