Type to search

maharashtra धुळे

सौंदाणेत रॉकेल टाकुन पेटवून घेत एकाची आत्महत्या

Share
धुळे । तालुक्यातील सौंदाणे येथे एकाने अंगावर रॉकेल टाकून पेटवून घेत आत्महत्या केल्याची घटना काल दि. 17 रोजी पहाटे घडली. याबाबात मोहाडी पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

यशवंत गुलाब बागुल (वय 45 रा. सौंदाणे ता. धुळे) यांनी काल दि. 17 रोजी पहाटे दोन वाजेच्या सुमारास राहत्या घरात रॉकेलच्या कॅनमधील रॉकेल काढून ते अंगावर ओतून पेटवून घेतले. त्यात ते गंभीररित्या भाजल्याने त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यू झाला. याबाबत मोहाडी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!