सोशल मिडीयावरील ‘डोण्टस’

0

मोबाईल नंबर साधारणत: सात-आठवर्षांपूर्वी फेसबुकने जेव्हा आपल्याकडून फोन नंबर मागितला तेव्हा आपली सिक्यूरिटी अधिक मजबूतकरण्याचे कारण सांगितले गेले होते. मात्र वास्तविकपणे यूजरकडून याचा गैरवापर होण्याची अधिक शक्यता आहे.

विशेषत: महिलांसाठी प्रँककॉल्स किंवा मानसिक छळयासारख्या घटनेला सामोरेजाण्याची भिती असते. अनेकमंडळी मिनिटा मिनिटाला व्हॉटस अप किंवा टेक्स्टमेसेज पाठवून त्रास देऊ शकतात. त्यात अँटीसोशल एलिमेंटचा समावेश असू शकतो किंवा प्रॉडक्ट विकणारे मार्केटिंगचे मंडळीचा.

त्यामुळे आपण कॉन्टॅट नंबर फेसबुकवरून शेअर करण्याच्या भानगडीत पडू नये. पर्सनल फोटो शेअरिंग:‘नेटिकेट इसेंशियल्स: न्यू रुल्स फॉर माइनिंग यूवर मॅनर्स इन अ डिजिटल वर्ल्ड’चे लेखकस्कॉट स्टिनबर्ग म्हणतात की, अशा प्रकारचा कोणताही फोटो आपण सोशल मिडियावर शेअर करू नये की, जेणेकरून नंतर आपल्याला पश्‍चातापाला सामोरे जावे लागेल.

अनेक मंडळी फेसबुकवर आनंदाच्या भरात मद्यपान करताना किंवा कुटुंबासमवेत महिलांबरोबर नाचताना, हुल्लडबाजी करताना फोटो शेअर करतात. या फोटोचा चुकीचा वापर होण्याची शक्यता असते. अशा प्रकारचे फोटो आपल्या वैयक्तिक आयुष्याला किंवा व्यवसायिक आयुष्यावर विपरित परिणाम करू शकतात.

आपल्या आजुबाजूला वावरणार्‍या लोकांत आपल्याविषयी असलेल्या श्रद्धेला धक्का पोहचू शकतो. जन्मतारीख, वाढदिवसाच्यादिवशी आपल्यावर शुभेच्छांचा वर्षांव होतो. यामुळे आपला दिवस अगदी संस्मरणिय राहतो, हे जरी खरे असेलतरी सध्याचे वातावरण खराब आहे, हे ही जाणून घ्यायला हवे. समाज विघातक मंडळी सोशल मिडियावर सक्रिय असल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे. आपले नाव, पत्ता, जन्मतारिख याचीमाहिती मिळवल्यानंतर गुन्हेगारीत तरबेज असलेला यूजर आपल्याशी निगडीत असलेली गोपनीय माहिती देखील हॅक करू शकतो. त्याचा वापर तो चुकीच्या ठिकाणी करू शकतो. अर्थात फेसबुकवर बर्थ-डे सेलिब्रेशनपेक्षा आपली सुरक्षाअधिक महत्त्वाची आहे. आपले ठिकाण, फेस्बुक्चे अनेक यूजर आपले लोकेशन सांगणारे फीचर अ‍ॅक्टिव्ह ठेवतात. ही सवय त्यांना अडचणीची ठरू शकते.

या शेअरिंगमुळे प्रत्येकला आपले ठिकाण समजतेच त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीला टाळायचे असेल तर आपण घराबाहेर आहोत, असे सांगणे देखील अडचणीचे ठरू शकते. समाज विघातक मंडळी अशा प्रकारच्या हालचालींवर लक्ष ठेऊन असतात आणि ते घर बंद असल्याचा गैरफायदा घेतात. त्यामुळे लोकशन शेअर करण्याच्या फंदात न पडलेले बरे. सुटी काळातील फोटोसेशन उन्हाळी किंवा दिवाळीतील सुटीचा हंगाम हा पर्यटनासाठी उपयुक्त काळ मानला जातो. आता तर सोशलमिडियामुळे हिल स्टेशन,बिच, किल्ले, गड,ऐतिहासिक ठिकाणांचे फोटो तात्काळ शेअर करण्याचा ट्रेंड वाढला आहे.

काही जण तर घराच्या बाहेर पडताच ‘विथ फमिली आऊट ऑन व्हॅकेशन फॉर 15 डेज’ अशी पोस्ट करून आपल्या सुटीचा डंका पिटतात. अर्थात आनंदाच्या भरात काही जण या गोष्टी शेअर करण्याच्या प्रेमात पडतात. मात्र आपण चोर मंडळींना नकळतपणे निमंत्रण देत असतो. आपल्या घराला कुलूप आहे आणि पंधरा दिवस ते बंद राहणार आहे, अशी जर माहिती पसरली गेली तर ही बाब चोर मंडळीच्या पथ्यावर पडते.

LEAVE A REPLY

*