Type to search

धुळे

सोळाशे घरांची तपासणी, अ‍ॅबेटींग, धुरळणीसह जनजागृती

Share

धुळे । शहरात महापालिकेमार्फत डेंग्यु व सदृश्य आजारांवर मात करण्यासाठी आजपासून व्यापक मोहिम सुरु करण्यात आली असून दिवसभरात विविध प्रभागातील सुमारे एक हजार 667 घरांची तपासणी करुन आवश्यक ती कार्यवाही करण्यात आली आहे

शहरातील नऊ भागात नऊ स्वच्छता निरिक्षकांच्या अधिपत्याखाली ही मोहिम राबविण्यात येत आहे. प्रत्येक स्वच्छता निरिक्षकास 30 कर्मचार्‍यांचे पथक देण्यात आले असून त्यांच्यामार्फत प्रत्यक्ष प्रत्येक घरात तपासणी व पाहणी करुन डेंग्यु प्रतिबंधक कार्यवाही करण्यात येत आहे. आजपासून सुरु झालेल्या या मोहिमेत शहरातील सुंदरच कॉलनी, महावीर नगर, सप्तश्रृंगी कॉलनी, संगमा चौक, जुनेधुळे, रामदास व्यायाम शाळा परिसर, वंजार गल्ली, शाळा क्र. 16 परिसर, भटाई माता चौक मोहाडी, बालू आबा नगर, जयशंकर कॉलनी, विजय कॉलनी अजमेरा नगर, अकबर चौक, बडगुजर कॉलनी, हजारे कॉलनी, मंगलमूर्ती कॉलनी, तुळशिराम नगर, छत्रपती नगर, भरत नगर, संताजी नगर, अग्रवाल नगर आदी विविध भागात ही मोहिम राबविण्यात आली आहे.

त्यात एकूण एक हजार 667 घरांची तपासणी व पाहणी करण्यात आली आहे. वरील भागात अँबेटींग, धुराळणी, फवारणी तसेच नागरिकांना या साथीच्या रोगासंदर्भात प्रबोधन करण्यात आले. ही कार्यवाही आशा वर्कर, मलेरीया फिल्ड वर्कर, स्वच्छता कर्मचारी यांच्यामार्फत राबविण्यात आली आहे. यासाठी सुमारे 300 कर्मचारी कार्यरत आहे. घरातील व घराबाहेरील दोन्ही ठिकाणची पाहणी करुन डास उत्पतीची स्थळे नष्ट करण्यात येत आहे.

ही मोहिम सामुहिक स्वरुपाची असल्याने यास नागरिकांची तितकेच सहकार्य आवश्यक आहे. यासाठी एकदा तपासणी करुन प्रतिबंधात्मक कार्यवाही झाल्यानंतर नागरीकांनी आपल्या स्वत:ची व कुटुंबियांची काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

ही कार्यवाही आयुक्त अजिज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आली असून यासाठी उपायुक्त गणेश गिरी, सहा.आयुक्त शांताराम गोसावी, आरोग्यधिकारी डॉ. मोरे, डॉ. मधुकर पवार, मलेरीया अधिकारी राजेश वसावे तसेच सर्व स्वच्छता निरिक्षक काम पाहत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!