Type to search

ब्लॉग

सोलर पॅनलमधून आता पाणीही!

Share

अमेरिकेतील ऍरिझोना राज्यात ‘झिरो मास वॉटर’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. त्यात विशिष्ट प्रकारचे मटेरिअल, सौरऊर्जा आणि संबंधित भूभागातील हवामान तसेच पर्जन्यमानाची एकंदर माहिती एवढ्यावरून सोलर पॅनल उभारून त्यापासून पाणी मिळवता येते.

पाण्याला जीवन असे उपनाम दिले जाते तेव्हाच त्याची प्राणीमात्रांसाठीची उपयुक्तता अधोरेखित होते. असे असले तरी मर्यादित जलस्त्रोत,
मर्यादित जलसाठे आणि वापरकर्त्यांची वाढती संख्या हे व्यस्त गुणोत्तर अधिकाधिक व्यस्त होत असल्यामुळे सध्याच्या काळात पाणीप्रश्‍न अधिकाधिक गंभीर होत आहे.

पाण्यासाठी वणवण ङ्गिरणारी माणसे, पाण्याअभावी तडङ्गडून मरणारे प्राणीजगत हा जागतिक पातळीवर चर्चेत असणारा मुद्दा आहे. कितीही योजना आखल्या आणि कितीही पैसे खर्च केले तरी मार्च ते जूनचा मध्य या कालावधीत आपल्याकडे पाण्याची प्रचंड कमतरता जाणवते. देशातला काही भाग तर अगदी कोरडाठाक पडतो. कितीही खोल खणले तरी विंधन विहिरींना पाणी लागत नसल्यामुळे एकंदरच भूजलपातळी खालावल्याचे भीषण वास्तव समोर येते. काही ठिकाणी महिन्यातून एकदा पाणी पुरवले जाते तर काही भागांची तहान भागवण्यासाठी रेल्वेच्या वॅगन्स उपयोगात आणल्या जातात. भारतासारख्या विकसनशील आणि लोकसंख्येचा उद्रेक असणार्‍या देशातच हे चित्र पाहायला मिळते असे नव्हे तर बर्‍याच कटिबंधीय देशांमध्ये अगदी अमेरिकेच्याही नैऋत्येकडील राज्यांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवते. यामागची कारणे वेगवेगळी असली (नैसर्गिक स्थिती, गरिबी, भ्रष्टाचार, योजना राबवण्यात समन्वय नसणे, अंतर्गत राजकारण, दूरदृष्टीचा अभाव इ.) तरी शेवटी पाण्याचा पेला रिकामा किंवा अर्धाच भरलेला राहतो, हे कटू वास्तव आहे.

पिण्यायोग्य अथवा वापरायोग्य पाणी पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसण्याचे आणखी एक कारण प्रदूषणामुळे उद्भवले आहे. नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये रासायनिक द्रव्ययुक्त सांडपाणी, कचरा, मैलापाणी, विविध कारखान्यांमधून निघणारे वेस्ट वॉटर बिनदिक्कत मिसळले जात असल्यामुळे बहुसंख्य नद्यांची अवस्था अत्यंत गंभीर आहे. पाण्याची दृश्यमानता, पारदर्शकता कमी होत असून विविध प्रकारचे विषाक्त घटक मिसळत असल्यामुळे ते जलचरांच्या जीवितासाठी अयोग्य ठरत आहेतच, याखेरीज ते माणसाच्या वापरायोग्यही राहत नाहीत. पाणीटंचाईला ही वस्तुस्थितीदेखील मोठ्या प्रमाणावर कारणीभूत ठरत आहे. याव्यतिरिक्त पाण्याचा गैरवापर, पाण्याची गळती, अनियोजित वापर यांसारख्या अनेक कारणांमुळे जग भीषण पाणीटंचाईचा सामना करताना दिसते. वेळीच हातपाय हलवले नाहीत तर नजिकच्या भविष्यकाळात पाणीप्रश्‍न अधिक गंभीर होणार असून यापुढचे महायुद्ध झालेच तर ते पाण्याच्या प्रश्‍नावरून होईल, असा अंदाज अनेक तज्ञांनी वर्तवला आहे. म्हणूनच याप्रश्‍नी देश-विदेशातले तज्ञ संशोधनात गुंतले असून सर्वच पातळ्यांवर उपाय शोधले जात असतात. त्यामध्येही नैसर्गिक ऊर्जास्त्रोत शक्य तितके अधिकाधिक वापरून शाश्‍वत विकास साधण्याचे प्रयत्नही जागरुकतेने होताना दिसतात. यामध्ये सोलर पॅनलचा नंबर बराच वरचा आहे. सौरऊर्जेचा वापर ङ्गक्त पाणी तापवण्यासाठी न करता पाणी मिळवण्यासाठीही करण्याचे प्रकल्प हाती घेतले जात आहेत. अशा आगळ्यावेगळ्या प्रयोगाची माहिती घ्यायलाच हवी.

नवकल्पना उचलून धरून संबंधितांना पैशाची तसेच इतर मदत पुरवण्याकडे सध्या अनेकांचा कल राहत आहे. या संकल्पनेला ‘स्टार्ट अप’ असे नाव आहे (भारत सरकारनेही स्टार्ट अपना प्रोत्साहन देणे सुरू केले आहे). अमेरिकेतल्या ऍरिझोना राज्यातला ‘झिरो मास वॉटर’ हा असाच एक उपक्रम (ुुु.ूशीेारीीुरींशी.लेा). विशिष्ट प्रकारचे मटेरिअल (ते कोणते हे कंपनीचे गुपित आहे), सौरऊर्जा आणि संबंधित भूभागातले हवामान तसेच पर्जन्यमानाची एकंदर माहिती एवढ्यावरून सोलर पॅनल उभारून त्यापासून पाणी मिळवता येते, असे या उपक्रमाचे संस्थापक आणि मुख्याधिकारी कोडी ङ्ग्रिसेन यांचे म्हणणे आहे. हा स्टार्ट अप गेली काही वर्षे सुरू आहे. प्रथम ‘झिरो मास’चे काम मंद होते परंतु आता पॅनल्सचे उत्पादन वाढवण्यात आले असून निदान अमेरिकेत तरी ती सर्वत्र मिळू लागले आहेत. हवा आणि सूर्यप्रकाशापासून पाणी कसे मिळते बुवा, हा प्रश्‍न अर्थातच कोणीही विचारेल. तर हवेमध्ये आर्द्रता ऊर्ङ्ग वाङ्गेच्या रूपात पाणी असतेच. गरम हवेचा कमी तापमानाच्या पृष्ठभागाशी संपर्क झाल्यावर सूक्ष्म थेंबांच्या रूपात हे पाणी प्रकट होते. आपण गवताच्या पात्यांवर, काचेच्या तावदानांवर असे जलबिंदू जमलेले नेहमी पाहतो. त्याचप्रमाणे काही पदार्थांच्या अंगी हवेतले बाष्प शोषण्याचा गुण असतो, म्हणजेच ते ‘हायग्रोस्कोपिक’ असतात. कॉङ्गी आणि साखर ही अगदी नेहमीच्या पाहण्यातली उदाहरणे आहेत. कॉङ्गी तासभर उघडी ठेवली तरी गुठळ्या झाल्याच म्हणून समजा! या सगळ्याचा अभ्यास करूनच संशोधकांनी हा उपक्रम राबवला आहे.

संबंधित संशोधकांनी या झिरो मास सोलर पॅनल्सवर पेटंट घेतलेले वैशिष्ट्यपूर्ण मटेरिअल चढवलेले असते. पॅनलच्या आत आणखी एका वेगळ्या मटेरिअलचा थर असतो जो हवेतली आर्द्रता शोषण्याचे काम करतो. दोन थरांमधल्या तापमानातल्या ङ्गरकाचा परिणाम म्हणून पाणी तयार होते. प्रक्रियेतून मिळालेले हे पाणी पॅनलखालच्या टाकीत जमा होते. त्यामध्ये काही प्रमाणात कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम मिसळले जाते. अशा प्रकारे दोन पॅनल्समधून दिवसाला साधारणत: दोन ते पाच लिटर पाणी मिळते. अर्थात, ही कार्यपद्धती इथे अगदीच थोडक्यात आणि सोपी करून सांगितली आहे. मटेरिअल सायन्स आणि फ्लुईड डायनॅमिक्स या विषयांचे ज्ञान असणार्‍यांना ही पद्धत अधिक चांगल्या प्रकारे समजेल. प्रचलित नवतंत्रज्ञानानुसार या पॅनल्समध्येही प्रोग्रॅमेबल सर्किट बोर्ड बसवला आहे. झिरो मासच्या मुख्य कार्यालयातले इंजिनिअर त्यांच्या जगभरातल्या पॅनल्सकडून डेटा घेत असतात. मिळालेले पाणी आणि हवामानाचा अंदाज हे या माहितीतले मुख्य घटक असतात. ही सर्व पॅनल्स मुख्यालयाबरोबरच परस्परांशीही स्वतंत्रपणे जोडलेली असल्यामुळे संपर्क साधणे सोपे असते. प्रत्येक नवनिर्माणाला दुसरी बाजू असतेच आणि त्या कसोटीवर नवकल्पना टिकणे अत्यंत महत्त्वाचे असते. खेरीज त्या व्यावहारिक पातळीवरही परवडण्याजोग्या असाव्या लागतात. इथेच ‘झिरो मास’चे हे संशोधन (सध्या तरी) थोडे मार खात आहे. हवेपासून पाणी मिळवून देणारी अशी दोन सोलर पॅनेल्स उभारण्याचा खर्च आहे तब्बल साडेचार हजार डॉलर्स! त्यामुळे पर्यावरणाची आणि शाश्‍वत विकासाची काळजी घेऊ पाहणारा मनुष्यही हा आकडा ऐकून जरा बिचकतो. यापेक्षा लांबून अथवा विकत आणलेलेही परवडते हे सामान्य गणित त्याच्या डोक्यात येते.

डॉ. अशोक गाडगीळ हे अमेरिकेतल्या बर्कले इथल्या कॅलिङ्गोर्निया विद्यापीठाच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागातील एक प्राध्यापक आहेत. ते गेली दोन दशके विकसनशील देशांमधल्या पाण्याच्या समस्येवर काम करत आहेत. त्यांच्या मतानुसार हवेतून पाणी मिळवण्याचा हा प्रयत्न स्तुत्य आहे यात शंकाच नाही, परंतु अगदीच (अक्षरशः) जीवनमरणाचा प्रश्‍न असेल तरच इतका खर्च करून कोणी ही यंत्रणा बसवेल. कारण किंचीतसे अयोग्य असणारे पाणी उकळूनदेखील पिण्यालायक बनवता येते. तेही किती तरी कमी खर्चात आणि चटकन! मात्र हा प्रयोग साकारणार्‍या ङ्ग्रिसेन यांना हे मान्य नाही. अशाप्रकारे पाणी मिळवण्यासाठी कोणतीही ऊर्जा वापरावी लागत नाही, असा त्यांचा मुख्य मुद्दा आहे. शिवाय कालांतराने हे तंत्रज्ञान पुष्कळच ओपन सोर्स पद्धतीने पुरवण्याचीही त्यांची तयारी आहे. अर्थात, कोणत्याही नव्या वस्तूची आरंभिक किंमत जास्तच असते हा साधा नियम लक्षात ठेवला तर काही वर्षांतच हे प्रकरण वाजवी किमतीत मिळण्याचीही शक्यता आहे. पाहू काय होते ते! सध्या तरी खरे महत्त्व आहे पाणी समस्या लक्षात घेऊन ती दूर करण्यासाठी वेगळ्या दिशेने विचार आणि प्रयत्न करण्याला!
-डॉ. दीपक शिकारपूर

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!