सोनेगाव येथे जनावरांचा टेम्पो पकडला

0

जामखेड (प्रतिनिधी) – टेम्पोमधून बेकायदेशीरपणे जनावरे घेऊन जात असताना नान्नज परिसरातील सोनेगाव येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने जामखेड पोलिसांनी टेम्पो पकडला. या टेम्पोेमध्ये एकुण 26 जनावरे आढळून आली.

 
नान्नज-सोनेगाव रोडवरील खैरी नदीच्या पुलावर 7 मे रोजी रात्री एमएच 23, डब्ल्यू. 121 या क्रमांकाच्या टेम्पोमधून 26 लहान मोठे जनावरे घेऊन जात असताना सोनेगाव येथील निलेश गायवळ मित्रमंडळाचे जानकीराम गायकवाड व त्यांच्या कार्यकर्त्यांनी तो टेम्पो पकडला. टेम्पोमधील जनावरे कोठे घेऊन चालला आहे. असे चालकाला विचारले असता चालकाला त्याचे उत्तर देता आले नाही.

 

याचवेळी चालक घटनास्थळाहून पळून गेला. यामुळे कार्यकर्त्यांना संशय आल्याने लगेच जामखेड येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष पांडुराजे भोसले, सचिन पवार, सुजित पवार, गणेश सूळ, योगेश सुरवसे, सुनील जगताप, नाना खंडागळे, संतोष निमोणकर, व संजय कोठारी यांना कळवले यानंतर ते जामखेड पोलीस ठाण्यातील पथकाला घेऊन घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी टेम्पोची तपासणी केली असता या त्यात 14 मोठे व 12 लहान असे एकूण 26 जनावरे अढळून आली.

 
याबाबत पोलीस कॉन्स्टेबल गणेश साने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी टेम्पो चालक जबीर (पूर्ण नाव माहीत नाही, रा. मोमीनपुरा, बीड) क्लूनर अब्दुल हमीद हबीब (वय 35, रा. बार्शी नाका, बीड) व मालक सत्तार मम्मासाब कुरेशी (रा. मोमिनपुरा, बीड) या तीन आरोपी विरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1995 चे कलम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र हा टेम्पो जनावरांना घेऊन कत्तलखान्याकडे चालला होता, असा संशय शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला असून त्या पद्धतीने वरील आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव सहारे हे करत आहेत.

LEAVE A REPLY

*