सोनगीरकरांनी केला वृक्ष लागवडीचा संकल्प

0
सोनगीर / येथे हरीत सोनगीर समितीकडून 5 जून ते 11 जून दरम्यान पर्यावरण सप्ताह साजरा केला जात असून अनेक वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे.
यापैकी काही वृक्ष आज ग्रामपंचायत आवारात लावण्यात आले.
प्रत्येक व्यक्तीने किमान एक झाड लावून ते जगवले तरच भावी पिढीला मोकळा श्वास घेता येईल. आपण भावी पिढीसाठी संपत्ती, मागे ठेऊन जातो. त्याच प्रमाणे चांगले पर्यावरण मागे ठेवणे ही देखील आपली जबाबदारी आहे.
झाडे जमिनीतील पाण्याची पातळी टिकवून ठेवतात. म्हणून पुढच्या पिढीच्या दृष्टिकोनातून प्रत्येकाने वृक्ष लावावे असे आवाहन हरीत सोनगीर समितीतर्फे करण्यात आले.

दरम्यान ग्रामपंचायत आवारात वृक्षारोपण प्रसंगी ग्रामपंचयात सदस्य राजेंद्र जाधव, किशोर पावनकर, पराग देशमुख, चंद्रशेखर परदेशी, ग्रामसेवक अविनाश बैसाणे, डॉ. राहुल देशमुख, डॉ.शशिकांत आपटे, सुरेश वाघ, गोपाल सैंदाणे, विशाल कासार, जितेंद्र बागूल, सतीश भावसार, प्रसाद जैन, पंचायत समिती सदस्या रुपाली रविराज माळी, सदस्या शकुंतला लोटन चौधरी, प्रतिभा ताराचंद लोहार, जयश्री मोहनदास लोहार, सुलभा संतोष ईशी व हरित सोनगीरचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

गेल्या वर्षी लावलेले सर्व वृक्षांची चांगली वाढ झाल्याने सर्वांनी आनंद व्यक्त केला. चायतीच्या मागील मैदानात 17 सदस्य व कर्मचारींच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले. वृक्षाची निगा, वृक्ष जगवण्याची शपथ घेण्यात आल. पर्यावरण वाचविणे कर्तव्य आहे या भावनेतून झाड लावावे.

घरासमोर रहदारीला अडथळा व अन्य कुठल्या कारणामुळे झाड लावणे शक्य होत नसेल तर ते झाड हरित सोनगीर समितीला दान म्हणून दयावे. समिती एखाद्या निश्चित केलेल्या ठिकाणी रोपण करेल असे आवाहन हरित सोनगीर समितीतर्फे नागरिकांना करण्यात आले.

LEAVE A REPLY

*