सैनिकांवर हल्ला करणार्‍यांच्या छातीत गोळ्या घाला

0

जळगाव  / गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण देश कश्मि मध्ये होत असलेल्या विषयावर चिंता ग्रस्त असून त्याठिकाणी भारतीय सैन्यावर, पोलिसांवर दहशतवादींच्या मदतीने हल्ले केले जात आहे.

सैनिकांवर हल्ले करणार्‍यांचा छातीत गोळ्या घाला कींवा त्यांच्यावर बॉम्ब हल्ला करण्याचे साहस शासनाने दाखवावे असा इशारा विश्व हिंदू परिषदेचे प्रविण तोगडीया यांनी केले.

विश्व हिंदू परिषद शिक्षा वर्ग मुंबई क्षेत्र, बजरंग शौर्य प्रशिक्षण वर्गाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपिठावर प. पू. महामंडलेश्वर जनार्दन महाराज, निलेश सुरतवाला, शंकर जायकर, हरिजी करकरे, अनंतराव पांडे, दादा शिंघल, सुरेंद्र मुंदडा आदी उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. पुढे बोलतांना प्रविण तोगडीया म्हणाले की, कश्मिर मध्ये सैनिकावर होणार हल्ला देशावर हल्ला करण्यासमान असून मुठभर असलेले लोक भारताला युद्धासाठी आव्हाण देत असल्याचे त्यांनी सांगीतले.

तसेच सद्यस्थितीत सुरु असलेल्या तीन तलाक कायद्याच्या मुद्द्यापेक्षा शेतकरी आत्महत्या, सुसक्षित बेरोजगार, शेतकर्‍यांची कर्जमाफी या मुद्द्यांवर लक्ष देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगीतले.

द्वेष सोडून सर्वांनी एकत्र यावे
कश्मिरच्या मुद्द्यांवरुन भारतीय लष्कार, पोलिसांवर हल्ले होत केले जात आहे. दरम्यान यावर तोडगा काढण्यासाठी सर्व हिंदूंनी, राजकीयांनी राजकिय द्वेष सोडून एकत्र येवून कश्मिरच्या मुद्द्यावर शासनाने तात्काळ निर्णय घ्यावा असे तोगडीया यांनी सांगीतले.

समान जनसंख्या कायदा तयार करा
देशात मुस्लिमांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. हे लोक दारीद्रय रेषेखाली असल्याचे सांगून शासकीय सेवांचा लाभ घेत आहे. तसेच तीन तलाक कायद्यापेक्षा समान जनसंख्या कायदा अत्यंत महत्वाचा आहे. हा कायदा लागू केल्यास दोन पेक्षा जास्त आपत्य असणार्‍यांना शासकीय सेवेत घेवू नये, या कुटुुंबांना स्वस्त धान्य देणे बंद करावे, निवडणुक लढविण्यास प्रतिबंध करावा, बँकेतून कर्ज देवू नये, त्यांच्या जवळील मतदानाचा हक्क काढून घेण्याचे त्यांनी सांगीतले.

तीन तलाक पेक्षा अनेक मुद्दे महत्वाचे
सध्या सर्वत्र सुरु असलेल्या तीन तलाक कायदा या मुद्द्यापेक्षा, काश्मिर मध्ये होणारे भारतिय सैनिकांचे शिरच्छेदाचे प्रमाण, शेतकरी आत्महत्या, शेतकर्‍यांचे कर्जमाफी, सुशक्षित बेरोजगार, मुस्लिमांची वाढती लोकसंख्या हे विषय अत्यंत गंभीर असून याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे. परंतू या कडे लक्ष दिले जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

प्रात्यक्षिकांचे सादरीकरण
बजरंग दलातर्फेे आयोजीत करण्यात आलेल्या दहा दिवसीय प्रशिक्षण शिबीरात दलाच्या कार्यकर्त्यांना आत्मसंरक्षण करण्यासाठी कराटे, दंडप्रहार याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. या प्रात्यक्षीकांचे यावेळी सादरीकरण करण्यात आले.

LEAVE A REPLY

*