सेरेना आणि नदाल चौथ्या फेरीत दाखल

0
न्यूयॉर्क । युएस ओपनमध्ये सेरेना विल्यम्सने आपली मोठी बहिण व्हिनस विल्यम्सला पराभूत करून चौथ्या फेरीत प्रवेश केला. तर पुरूष एकेरीमध्ये दिग्गज टेनिसपटू राफेल नदालने चौथ्या फेरीत प्रवेश केला.

सेरेनाने व्हिनस विरुद्ध 6-1, 6-2 असा विजय सहज मिळवला. पुढच्या फेरीत सेरेनाला काईया कानेपी हिच्यासोबत लढायचे आहे. तर पहिल्या फेरीत जागतिक क्रमवारीमध्ये नंबर वन असलेल्या सिमोना हालेपला पराभूत करणार्‍या कानेपी हिने स्वीडनच्या रेबेका पीटरसनला धुळ चारली. तिने 6-3, 7-6 (7-3) असा विजय मिळवला.

पुरुष गटात राफेल नदालने रशियाच्या कारेन खाचनोवला धुळ चारली. अव्वल मानांकित नदालला युवा खाचनोववर विजय मिळवण्यासाठी चांगलाच संघर्ष करावा लागला. चार तास 23 मिनिटे चाललेल्या या सामन्यात 5-7, 7-5, 7-6 (9-7), 7-6 (7-3) असा विजय मिळवला.

LEAVE A REPLY

*