सेनेत येणार्‍यांचा योग्य सन्मान : अनिल राठोड

0

  काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष लसगरे यांचा सेनेत प्रवेश

अहमदनगर (प्रतिनिधी) – शिवसेना हा सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडविणारा पक्ष असल्याने, सर्वच स्तरातील लोकांना हा पक्ष आपलासा वाटतो. सेनेच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्‍नांना प्राधान्य देत असल्याने अनेक प्रश्‍न मार्गी लागले आहेत. त्यामुळे सेनेत काम करण्यास भरपूर वाव आहे. त्यामुळे युवक शिवसेनेत दाखल होत असल्याचे प्रतिपादन शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी केले.
काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष पन्नालाल लसगरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना उपनेते राठोड यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शहरप्रमुख दिलीप सातपुते, संभाजी कदम, नगरसेवक विक्रम राठोड, दत्ता मुदगल, अशोक दहिफळे, दीपक कावळे, महेश शेळके, मुन्ना भिंगारदिवे, रोहित आहेर, आदित्य आहेर, धनेश दिंडे, मिलिंद शिंदे, अमोल पारधे, सचिन बाबनी, योगेश भंडारे, विशाल व्यवहारे, मुकेश इंगळे, प्रविण वाघमारे, अक्षण बाबनी, निलेश परदेशी, मोहित परदेशी, रितेश लसगरे, मयुर बाबनी, विकी प्रभावळकर, शफिक मोगल आदी उपस्थित होते.
राठोड म्हणाले, शिवसेनेत कार्यकर्त्यांना काम करण्यास संधी मिळते. आज केंद्रात, राज्यात शिवसेना सहभागी आहेत. तसेच महानगपालिकेतही शिवसेनेच्या महापौर असल्याने कार्यकर्त्यांनी त्या माध्यमातून नागरिकांचे काम करावीत. पन्नालाल लसगरे व त्यांच्या कार्यकर्त्यांना पक्षात योग्य तो सन्मान दिला जाईल.
यावेळी लसगरे म्हणाले, मी गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसमध्ये काम करत होता. परंतु तेथे काम करतांना अनेक अडचणी येत. सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडविण्याबाबत तेथे उदासिनता दिसून येत होती. म्हणून शिवसेनेत प्रवेश करुन समाजातील तळगाळातील लोकांनासाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. शहरप्रमुख दिलीप सातपुते यांचेही भाषण यावेळी झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लंकेश हरबा यांनी केले तर दिपक कावळे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

*