सुशांत-अंकिताचे ‘कॉफी डेट’!

0

जवळपास सात वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. पण, अजूनही त्यांच्यातील नाते पूर्ववत होण्याची काही चिन्हं दिसून येत आहेत.

सुशांत-अंकिता कॉफी डेटवर गेल्याचे वृत्त नुकतेच समोर आले आहे.

कॉफी हाऊसमध्ये भेटल्यानंतर दोघांनीही एकमेकांशी शांतपणे चर्चा केली. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, सुशांत-अंकिताच्या टेबलवर एकदम शुकशुकाट होता. त्यांनी एकमेकांशी कोणताही वाद न घालता शांतपणे चर्चा केली. त्यानंतर ते तेथून निघून गेले. दोघांच्या या भेटीनंतर ते पुन्हा एकत्र येणार असल्याची चर्चा आता मनोरंजन विश्वात सुरु झाली आहे.

LEAVE A REPLY

*