सुवर्णकन्या श्रद्धा घुले अडकणार लग्नबंधनात

0
अकोले (प्रतिनिधी) – महाराष्ट्र शासनाचा शिव छत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडू व अकोलेची सुवर्णकन्या श्रद्धा भास्करराव घुले लवकरच विवाहबद्ध होणार आहे. हिचा वाड;निश्‍चय समारंभ सिन्नर ( जि. नाशिक) पाटोळे येथील रविंद्र ज्ञानेश्वर खताळे (आय. ए. एस) यांच्याशी संगमनेर येथे आज गुरुवारी पार पडणार आहे.
रवींद्र खताळ आय.ए.एस (भारतीय प्रशासकीय सेवा) परीक्षा उत्तीर्ण असून गुजरात केडर येथे दिनांक 22 मे रोजी जिल्हाधिकारीपदी त्यांची नियुक्ती होणार आहे.
श्रद्धा घुले हिने आत्तापर्यंत देश -विदेश व राज्य पातळी वरील विविध स्पर्धांमध्ये 61 सुवर्णपदकांसह 132 पदकांची कमाई केली आहे़. शिव छत्रपती क्रीडा पुरस्कार,ज्युनियर अँड एशियन फिंगर चॅमप्पियनशिप अशा विविध पुरस्काराने सन्मानित श्रद्धा झालेली आहे. अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक भास्करराव घुले व बुवासाहेब नवले पतसंस्थेच्या संचालिका, कुंभेफळ येथील शेषनारायण विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका प्रतिभा घुले यांची ती कन्या आहे.
श्रध्दाने आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय व विद्यापीठ पातळीवर तिहेरी व उंच उडीत सुवर्ण (गोल्ड), रौप्य (सिल्वर), कास्य (ब्रॉन्झ) असे एकूण 132पदके पटकावली आहेत. 2007 साली पुणे येथे युवा राष्ट्रकुल स्पर्धेत तिहेरी उडीत तिने अगोदरचे सर्व विक्रम मोडीत काढत 13.11 मीटर उडी घेत विश्वविक्रम प्रस्थापित केला. या क्रीडा प्रकाराला आई, वडील व तिचे प्रशिक्षक,चाहते यांचे प्रोत्साहन आहे.श्रद्धा बद्दल अकोले-संगमनेर सह नगर जिल्ह्याला तिच्या कार्य कर्तृत्वाचा अभिमान आहे.

 

LEAVE A REPLY

*