Type to search

Featured

सुरैश रैनाने घडविला इतिहास

Share
चेन्नई ।  इंडियन प्रीमियर लीगमधील सर्वात मोठा फलंदाज सुरैश रैनाने शनिवारी आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात इतिहास घडविला. आयपीएलच्या 12 व्या पर्वास काल चेन्नई आणि बंगळुरूच्या यांच्यातील पहिल्या सामन्याने सुरुवात झाली. याच सामन्यात रैना 5 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे.

32 वर्षीय रैनाने हा कारनामा 177 सामन्यांत पूर्ण केला. चेन्नईच्या चेपॉक मैदानावर खेळलेल्या या सामन्यात उमेश यादवच्या 9 व्या षटकातील पाचव्या चेंडूवर रैना एक धाव घेऊन हा कारनामा केला. या सामन्यापूर्वी त्याला 5 हजार धावा पूर्ण करण्यासाठी त्याला 15 धावांची गरज होती. कालच्या सामन्यात सुरैश रैनाने 21 चेंडूत 19 धावा करुन बाद झाला.

याच सामन्यात विराट कोहलीलाही 5 हजार धावा करण्याची संधी होती. त्याला 5 हजार धावांचा टप्पा पूर्ण करण्यासाठी 52 धावांची गरज होती. पण तो 6 धावा काढून बाद झाला. पुढच्या सामन्यात विराटने 46 धावा केल्यास सर्वात वेगाने 164 सामन्यात पाच हजार धावा पूर्ण करण्याचा पराक्रम करु शकतो. कालच्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने रॉयल चॅलेजर्स बंगळुरू संघाचा 7 गडी राखून पराभव केला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!