Type to search

सुरक्षित पासवर्डचा वापर

ब्लॉग

सुरक्षित पासवर्डचा वापर

Share

सध्याच्या इ-युगात सर्व व्यवहारांसाठी वापरले जाणारे विविध पासवर्ड लक्षात ठेवणे किंवा सुरक्षित ठिकाणी नोंदणे हीदेखील डोकेदुखीच बनू लागते. ‘बायोमेट्रिक’ म्हणजे शारीरिक वैशिष्ट्यांचा वापर करून होणार्‍या ओळख पडताळणीचे प्रमाण वाढत असले तरीही व्यावहारिकतेचा विचार करता जगात बहुसंख्य ठिकाणी पिन किंवा पासवर्ड एंटर करण्याला पर्याय नाही असे दिसते. पासवर्डची सुरक्षितता या विषयावर आतापर्यंत बरेच लिहिले गेले असले तरीही अनेकजण अजूनही 123456 पासवर्ड वापरतात किंवा स्वतःच्या नावाचा उपयोग करतात! बहुसंख्य व्यक्तींची एकापेक्षा जास्त इ-मेल खाती किंवा बँक खाती असतात. यासाठीदेखील एकच सामायिक पासवर्ड (किंवा एकाच मूळ पासवर्डची किंचीत बदललेली रूपे) वापरणारे कितीतरी लोक आहेत. असे करणे घातक आहे.

मुळात आपला पासवर्ड इतरांपर्यंत पोहोचतो कसा? माझ्या साध्याशा इ-मेल अकाऊंटशी कोणाला देणेघेणे असणार आहे? ही शंका मनात येणे अगदी नैसर्गिक आहे. परंतु अनेक व्यक्तींना त्यामध्ये रस असू शकतो. उदा. आपले व्यावसायिक शत्रू, आपणास माहीत नसलेले आपले गुप्त हितचिंतक! आपल्या इ-आयुष्याचे खासगीपण जपण्यासाठी सुरक्षित पासवर्डचे महत्त्व तितकेच मोठे आहे. वर उल्लेखलेल्या व्यक्तींना आपल्या आवडीनिवडी इत्यादीबाबत बर्‍यापैकी माहिती असेल तर ते आपण कोणता पासवर्ड निवडला याचा प्राथमिक अंदाज करू शकतात.

आपल्या खात्याचे ‘युझरनेम’ माहीत असलेली अशी व्यक्ती, अंदाजित पासवर्ड भरून ‘फरगेट युअर पासवर्ड? क्लिक हिअर’ किंवा ‘पासवर्ड रिकव्हरी’सारख्या पर्यायी सुविधांचा वापर करून आपल्या खात्यापर्यंत पोहोचू शकते. तशात या व्यक्तीला चांगल्यापैकी संगणकीय ज्ञान असले किंवा यासाठी तिने एखाद्या ‘प्रोफेशनल हॅकर’ची मदत घेतली की संपलेच.

एखादा पासवर्ड पुरेसा सुरक्षित आहे वा नाही हे ठरवायचे कसे? पासवर्डमधील शब्दांची निवड पुरेशी गुंतागुंतीची असली की तो बर्‍यापैकी ‘स्ट्रॉँग’ बनणार हे उघड आहे. हॅकर्सचे काम संगणकीय ज्ञानाच्या फारच उच्च पातळीवरून चालते आणि सर्वसामान्य वापरकर्ता त्याबाबत काहीही करू शकत नाही हे सत्य असले तरी मुळात पासवर्ड स्ट्रॉँग असल्याने त्याची चोरी होण्याची शक्यता तर आपणास नक्कीच कमी करता येते. सुरक्षित पासवर्ड बनवण्याच्या आदर्श पद्धतीनुसार अशा पासवर्डमध्ये आकडे आणि अक्षरे अशा दोन्ही बाबी समाविष्ट हव्या. याची एकूण संख्या कमीत कमी 16 असावी. त्यामध्ये काही अक्षरे ‘कॅपिटल’ असावी. काही ‘स्पेसेस’ म्हणजे मोकळ्या जागाही असाव्या. सर्वसामान्य पातळीवर अतिपरिचित असलेले शब्द किंवा संख्या त्यामध्ये वापरले जाऊ नयेत…इ. इ. – (बापरे!).

पासवर्डच्या ताकदीचे मूल्यमापन करणार्‍या सॉफ्टवेअर्सचा वापर काही सेवा-पुरवठादार करतात हे आपण कधी ना कधी अनुभवले असेल. आपण पासवर्ड एंटर केल्यानंतर एका पट्टीवरील रंगाने किंवा तारका चित्राद्वारे त्याची सुरक्षितता दर्शवली जाते. असे चार-पाच 12 अक्षरी पासवर्ड, कितीही आदर्श आणि सुरक्षित असले तरी लक्षात ठेवणे व्यावहारिकदृष्ट्या जवळजवळ अशक्य आहे हे उघड आहे. मग यावर उपाय काय? एक मार्ग म्हणजे एखादे वाक्य मनात ठरवायचे आणि त्यामधील शब्दांच्या फक्त आद्याक्षरांचा पासवर्ड बनवायचा. म्हणजे असे की ङ्गख हेशि खपवळर ुळपी सेश्रव ाशवरश्र ळप ढेज्ञूे ेश्रूाळिली 2020ङ्घ हे वाक्य घ्या. यातील शब्दांची पहिली अक्षरे घेतल्यास खहखुसाळीें2020 असा पासवर्ड तयार होईल. पाहिलेत, यामध्ये आकडे आणि अक्षरे (तीदेखील स्मॉल तसेच कॅपिटल) यांचे योग्य मिश्रण झाले आहे आणि वर्णसंख्या आहे 13. बरे नाहीच मिळाले सुवर्णपदक तर स्पर्धा संपल्यानंतरच्या परिस्थितीनुसार आपण वाक्य आणि पर्यायाने पासवर्ड बदलू शकता.

दुसरा उपाय म्हणजे संगणकीय प्रणालीत किंवा इंटरनेटवर मिळू शकणार्‍या ‘पासवर्ड जनरेटर’ अ‍ॅप्लिकेशनचा वापर करणे. यासाठीच्या भरपूर साईटस्देखील आहेत. उदा. जपश्रळपश झरीीुेीव ॠशपशीरीेीं. आपल्या पासवर्डचे मूल्यांकन करून देणारी साईट केु डशर्लीीश ळी ाू झरीीुेीव? याच नावाने उपलब्ध आहे. तेथील मुख्य पृष्ठावरील खिडकीत आपण सध्या वापरात असलेला पासवर्ड टाईप करून त्याचे लगेचच मूल्यांकन मिळवू शकता. काही साईटस्वर आपला पासवर्ड कमकुवत असल्यास त्यामध्ये सुधारणा करण्याबाबतचे उपायही सुचवले जातात.

पासवर्ड लक्षात ठेवायचा कसा? त्यावरही उपाय आहे. तो म्हणजे ‘लास्टपास’ (ङरीींझरीी) ही साईट वापरणे. याला ‘पासवर्ड मॅनेजमेंट’ असे म्हणतात. या साईटच्या कामकाजामध्ये ‘ऑनलाईन’ आणि ‘ऑफलाईन’ असे दोन भाग असल्याने संकेतनाचे (एन्क्रिप्शन) काम आपल्या संगणकातच केले जाते. हे अ‍ॅप्लिकेशन आपले पासवर्ड सुरक्षितपणे लक्षात ठेवते आणि संगणकावर अर्ज भरताना ‘ऑटोफिल’ प्रकारे आपोआप पासवर्ड भरण्यासाठी त्याचा वापर करता येतो. ही प्रणाली वापरण्यासाठीचा एकच पासवर्ड आपण लक्षात ठेवण्याबरोबरच कोठेतरी लिहून ठेवावा हे उत्तम. कारण हा(देखील) पासवर्ड आपण विसरलात तर लास्टपास तो ‘रिकव्हर’ करून देत नाही ही बाब(देखील) ध्यानात ठेवा म्हणजे झाले.
– डॉ दीपक शिकारपूर

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!