सुबोध ‘कट्यार’ नंतर ‘पुष्पक विमान’द्वारे पुन्हा दिसणार दिग्दर्शकाच्या भूमिकेत

0

कट्यार काळजात घुसली या चित्रपटानंतर आता सुबोध कोणता चित्रपट दिग्दर्शित करणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.
सुबोध लवकरच त्याच्या दुसऱ्या चित्रपटावर काम करायला सुरुवात करणार असल्याचे त्याने सोशल मीडियाद्वारे घोषित केले आहे.

त्याने ट्विटर या सोशल नेटवर्किंग साइटला एक पोस्टर टाकले असून त्यावर पुष्पक विमान असे चित्रपटाचे नाव लिहिले आहे आणि या चित्रपटाचे दिग्दर्शन सुबोध भावे आणि वैभव चिंचाळकर करणार असल्याचे म्हटले आहे.

सुबोधने या चित्रपटाची घोषणा दादासाहेब फाळके यांच्या जंयतीच्या निमित्ताने केली आहे.

या चित्रपटाची कथा काय असणार तसेच या चित्रपटात कोणते कलाकार मुख्य भूमिकेत असणार, या चित्रपटात सुबोध काम करणार की नाही याबाबत त्याने मौन राखणेच पसंत केले आहे.

आता सुबोध या चित्रपटाबाबत पुढील घोषणा कधी करतो याची उत्सुकता त्याच्या फॅन्सना लागलेली आहे.

LEAVE A REPLY

*