सुटीवर आलेल्या लेफ्टनंटचे अपहरण व टॉर्चर करून हत्या

0
अतिरेक्यांनी भारतीय लष्करातील लेफ्टनंटचे अपहरण करून त्यांची हत्या केली.

काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्याचे रहिवासी लेफ्टनंट उमर फैयाज पेरी लष्करात रुजू झाल्यानंतर पहिल्यांदाच सुटीवर घरी आले होते.

मंगळवारी रात्री मामेबहिणीच्या लग्नासाठी ते शोपियाच्या हरमेन भागात गेले होते.

लग्न समारंभादरम्यानच रात्री १० वाजता सहा सशस्त्र अतिरेक्यांनी त्यांचे अपहरण केले. सकाळी साडेसहा वाजता घरापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर त्यांचा मृतहेद आढळून आला. त्यानंतर लेफ्टनंट फैयाज यांच्या जनाजावरही लोकांनी दगडफेक केली.
एखाद्या लष्करी अधिकाऱ्याचे अपहरण करून अशा पद्धतीने त्यांची हत्या करण्याची काश्मिरातील नजीकच्या काही वर्षांतील ही पहिलीच घटना आहे.
अतिरेक्यांनी लेफ्टनंट फैयाज यांना लष्करात भरती न होण्यासाठी धमकी दिली होती. मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

LEAVE A REPLY

*