‘सुखोई ३०’ विमानाचे अवशेष सापडले

0

भारतीय हवाई दलाच्या ‘सुखोई ३०’ या विमानाचे अवशेष काही वेळापूर्वीच सापडले आहेत.

आसामच्या तेजपूर येथून २३ मे रोजी बेपत्ता झालेल्या ज्याठिकाणी विमानाचा रडारशी संपर्क तुटला होता तेथून जवळच असलेल्या परिसरात विमानाचे अवशेष सापडले आहे.

मात्र, यावेळी विमानात वैमानिक आढळून आले नाहीत. गेल्या तीन दिवसांपासून हवाई दलाकडून युद्धपातळीवर या विमानाचा शोध सुरू होता.

हवाई दलाचे सुखोई ३० हे विमान मंगळवारी तेझपूर सलोनीबारी या तळावरून नियमित सरावासाठी झेपावले होते. या विमानात दोन वैमानिक होते. आसाममधील तेजपूरच्या उत्तर भागात असताना विमानाचा रडारशी संपर्क तुटला.

त्यानंतर हवाई दलाकडून युद्धपातळीवर या विमानाचा शोध सुरू होता.

 

LEAVE A REPLY

*