सुकमा हल्ल्याप्रकरणी चार संशयित नक्षलवाद्यांना अटक

0

छत्तीसगडमधील सुकमा हल्ल्याप्रकरणी हल्ल्यानंतर सीआरपीएफ जवानांनी राज्य पोलिसांच्या मदतीने सुकमा, चिकपाल आणि फूलबाग्री गावात संयुक्तपणे केलेल्या कारवाईत चार संशयित नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे.

हुंगा मदकामी, पुजरा आणि आयाती अशी अटक केलेल्या संशयित नक्षलवाद्यांची नावं आहेत. तर त्यापैकी एक जण अल्पवयीन आहे.

24 एप्रिल रोजी छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 25 सीआरपीएफ जवान शहीद झाले तर सहा जण जखमी झाले होते.

दरम्यान, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर आज सुकमा दौऱ्यावर आहेत.

LEAVE A REPLY

*